Acid Attack In Bihar : भीषण घटना! एकतर्फी प्रेमातून फेकले संपूर्ण कुटुंबावर अ‍ॅसिड

author img

By

Published : May 22, 2023, 4:13 PM IST

Acid Attack
अ‍ॅसिड हल्ला ()

बिहारमध्ये एका वेड्या प्रियकराने एकतर्फी प्रेमातून टोकाचे पाऊल उचलले. एका विवाहितेने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिल्यानंतर त्याने तिच्यासह तिच्या सर्व कुटुंबावर अ‍ॅसिड ओतले.

मुझफ्फरपूर (बिहार) : एकतर्फी प्रेम अनेकदा जीवघेणे ठरते. अशा प्रेमात प्रेमी जीव घेण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. असेच एक प्रकरण बिहारमधील पूर्व चंपारणमधून समोर आले आहे. विवाहितेने नकार दिल्यानंतर एका विक्षिप्त व्यक्तीने तिच्या संपूर्ण कुटुंबावर अ‍ॅसिडने हल्ला केला. सर्व जखमींना एसकेएमसीएच रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सर्वांवर उपचार सुरू आहेत.

रात्री झोपेत अ‍ॅसिड ओतले : हे प्रकरण पूर्व चंपारणच्या पिपरा पोलिस स्टेशन परिसरातील आहे. येथे एक महिला पती आणि दोन मुलांसह घरात झोपली होती. तेव्हा त्या वेड्या प्रियकराने घराजवळ पोहोचून संपूर्ण कुटुंबावर वरून अ‍ॅसिड ओतले. अ‍ॅसिड हल्ल्यात महिला, तिचा पती आणि दोन्ही मुले भाजल्या गेली. सकाळी चौघांनाही उपचारासाठी मोतिहारीहून मुझफ्फरपूरला आणण्यात आले. पीडित महिलेचे म्हणणे आहे की, आरोपी महेश भगत हा नळाच्या पाण्याचे कंत्राट देतो. यामध्ये तिचा पती मजुरीचे काम करतो. यादरम्यान ती महिला त्याच्या संपर्कात आली. महेश भगत तिला त्याच्यासोबत यायला सांगत असे. मात्र तिने नकार दिल्यानंतर त्याने कुटुंबावर अ‍ॅसिडने हल्ला केला.

तो आम्हाला धमक्या द्यायचा. आम्हाला हाकलून लावायचा. त्याला माझ्याशी लग्न करायचे होते. त्याने मोतिहारी कोर्टातून लग्नाचे डुप्लिकेट कागदपत्रही बनवले होते. मी नकार दिल्यामुळे त्याने माझ्यावर, माझा नवऱ्यावर व मुलांवर अ‍ॅसिड फेकले. - पीडिता स्त्री

लग्नाची डुप्लिकेट कागदपत्रे बनवली होती : पीडित महिलेने पुढे सांगितले की, महेश भगतने मोतिहारी कोर्टातून दोघांसाठी लग्नाची डुप्लिकेट कागदपत्रे बनवून आणली होती. पेपर बनवल्यानंतर तो तिच्यावर कुटुंबाला सोडून त्याच्यासोबत चलण्यासाठी दबाव टाकत होता. मात्र तिने याला नकार दिला. यानंतर त्या विक्षिप्त प्रियकराचा संयम सुटला आणि त्याने महिलेला धमकावले. त्यानंतर रविवारी मध्यरात्री त्याने महिलेसह तिच्या संपूर्ण कुटुंबावर अ‍ॅसिड ओतले आणि तेथून पळ काढला. एवढेच नाही तर हल्ल्यानंतर मदत मिळू नये म्हणून त्याने घराचा दरवाजाही बाहेरून बंद केला. सकाळनंतर ही घटना आजूबाजूच्या लोकांना समजली. आरडाओरडा ऐकून लोक पोहोचले आणि त्यांनी सर्वांना तातडीने रुग्णालयात नेले. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

हेही वाचा :

  1. Sexual Assault Case Thane : ठाण्यात ६ वर्षीय मुलीचा विनयभंग, खून प्रकरणात पोलीस अपयशी, आरोपी निर्दोष
  2. Pune Crime News: पुण्यात वेश्याव्यवसायाचे वाढते सत्र; पिंपरी-चिंचवडमध्ये स्पाच्या नावाखाली चालत होता वेश्याव्यवसाय, दलालास पोलिसांनी ठोकल्या बेड्या
  3. Pune Crime News : पुण्यात आता चपलांचीही चोरी! चोरट्यांनी गोडाऊनमधून चोरल्या 40 हजारांच्या चपला!
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.