AAP MLA Amanatullah khan : दिल्लीतील आपचे आमदार अमानतुल्ला खान अडचणीत.. दिल्ली पोलिसांकडून गुंड म्हणून घोषणाा

author img

By

Published : May 13, 2022, 5:51 PM IST

AAP MLA Amanatullah khan

आपचे आमदार अमानतुल्ला खान यांच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. काही वेळापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत अमानतुल्ला खान यांना पोलीस ठाण्यात घोषित गुंड (बीसी) बनविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जामिया नगर पोलिस स्टेशनचे एसएचओ सतीश कुमार यांनी यासाठी एक हिस्ट्री शीट तयार केली होती. त्याला जिल्ह्याच्या डीसीपी ईशा पांडे यांनी 30 मार्च 2022 रोजी मान्यता दिली होती.

नवी दिल्ली - ओखला विधानसभा मतदारसंघातील आपचे आमदार अमानतुल्ला खान यांना दिल्ली पोलिसांनी जामिया पोलीस ठाण्याचे गुंड म्हणून घोषित केले आहे. गेल्या मार्च महिन्यात ही कारवाई करण्यात आली होती. हा खुलासा अमानतुल्ला खान तुरुंगात गेल्यानंतर झाला आहे. आमदार खान यांना गुंड घोषित करण्यास दक्षिण-पूर्व जिल्ह्याच्या डीसीपी ईशा पांडे यांनी मान्यता दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आपचे आमदार अमानतुल्ला खान यांच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. काही वेळापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत अमानतुल्ला खान यांना पोलीस ठाण्यात घोषित गुंड (बीसी) बनविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जामिया नगर पोलिस स्टेशनचे एसएचओ सतीश कुमार यांनी यासाठी एक हिस्ट्री शीट तयार केली होती. त्याला जिल्ह्याच्या डीसीपी ईशा पांडे यांनी 30 मार्च 2022 रोजी मान्यता दिली होती. या हिस्ट्री शीटमध्ये अमानतुल्ला खान यांच्यावर एकूण १८ गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले आहे. यापैकी 7 प्रकरणांमध्ये त्यांची सुटका झाली आहे. 2 प्रकरणांतून त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. एक एफआयआर संपला आहे. तर 5 प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत.

दिल्ली पोलिसांकडून गुंड म्हणून घोषणाा
दिल्ली पोलिसांकडून गुंड म्हणून घोषणाा

पोलिसांनी तयार केलेल्या हिस्ट्री शीटमध्ये एसएचओ सतीश कुमार यांनी सांगितले आहे की, अमानतुल्ला खान हा जामिया नगरच्या जोगाबाई एक्स्टेंशनचा रहिवासी आहे. त्याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नीशिवाय एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. अमानतुल्ला खान यांच्याकडून परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याच्यावर धमकावणे, दुखापत करणे, सरकारी कामात अडथळा आणणे आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अमानतुल्ला खान हा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. जमीन बळकावण्याच्या प्रकरणातही त्याचा सहभाग आहे. त्यांच्या हालचालींवर पोलिसांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे त्याला पोलीस ठाण्यात घोषित गुंड करण्याची शिफारस एसएचओकडून करण्यात आली. त्याला डीसीपींनी मान्यता दिली आहे.

हेही वाचा-Farmer work without legs - तेलंगणातील शेतकऱ्याची विलक्षण जिद्द; अपघातात पाय गामावूनही शेतीची कामे सुरू

हेही वाचा-Shimla Car Accident Viral Video : कारच्या पादचाऱ्याला धडक, सीसीटीव्हीत कैद झालेला व्हिडिओ व्हायरल

हेही वाचा-Congress Chintan Shibir : द्वेष पसरवून केंद्र सरकारची अल्पसंख्याकांवर दडपशाही - सोनिया गांधी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.