भारत बायोटेक कोरोना संपविणारी लस करणार विकसित, कंपनीला मिळाला 149 कोटी रुपयांचा निधी

author img

By

Published : May 11, 2022, 7:26 PM IST

Updated : May 11, 2022, 10:42 PM IST

भारत बायोटेक लस

सेपी आपल्या 200 दशलक्ष डॉलर कार्यक्रमांतर्गत COVID-19 व्हेरियंट आणि इतर बीटा कोरोना व्हायरस विरूद्ध सर्वसमावेशक संरक्षण प्रदान करणाऱ्या लसींचा विकास करण्यासाठी पुढाकार घेणार ( adjuvant subunit vaccine ) आहे. सेपीकडून भविष्यातील व्हायरसच्या प्रकारांविरूद्ध सर्वसमावेशक संरक्षण प्रदान करण्यासाठी प्रयत्न करण्यात ( funding to Bharat biotech ) येत आहे.

हैदराबाद - कोरोना विरोधात लस विकसित करणाऱ्या भारत बायोटेकबाबत महत्त्वाची बातमी आहे. सेपीने ( Coalition for Epidemic Preparedness Innovation ) ने सांगितले की लस निर्माता भारत बायोटेक इंटरनॅशनलला सिडनी युनिव्हर्सिटी आणि स्वित्झर्लंड स्थित एक्सेलजीन यांना USD 19.3 दशलक्ष यांना (सुमारे 149 कोटी) देणार आहे. सेपीची ही रक्कम 'व्हेरियंट प्रूफ' लस विकसित करण्यासाठी वापरण्यात ( variant proof vaccine ) येणार आहे.

सेपी आपल्या 200 दशलक्ष डॉलर कार्यक्रमांतर्गत COVID-19 व्हेरियंट आणि इतर बीटा कोरोना व्हायरस विरूद्ध सर्वसमावेशक संरक्षण प्रदान करणाऱ्या लसींचा विकास करण्यासाठी पुढाकार घेणार ( adjuvant subunit vaccine ) आहे. सेपीकडून भविष्यातील व्हायरसच्या प्रकारांविरूद्ध सर्वसमावेशक संरक्षण प्रदान करण्यासाठी प्रयत्न करण्यात ( funding to Bharat biotech ) येत आहे.

नवीन प्रकारच्या रोगांचा धोका - सेपीकडून संशोधकांना इम्युनोजेन डिझाइन, प्रीक्लिनिकल स्टडीज, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस डेव्हलपमेंट आणि फेज 1 क्लिनिकल चाचण्यांसाठी निधी देण्यात येणार आहे. सीईपीआयचे सीईओ रिचर्ड हॅचेट म्हणाले की, कोरोना संसर्गाच्या वारंवार येणाऱ्या लाटा आपल्याला आठवण करून देतात की, आपल्याला पुढील अनेक वर्षे व्हायरस सोबत जगावे लागेल. सध्याच्या नवीन प्रकारच्या रोगांचा धोका आहे त्यामुळे व्हेरियंट-प्रूफ SARS-CoV-2 लसींसाठी R&D मध्ये गुंतवणूक करणे ही जागतिक आरोग्य सुरक्षा अत्यावश्यक आहे.

Krishna Ella
भारत बायोटेकचे संस्थापक कृष्णा इल्ला

व्हायरसच्या दीर्घकालीन नियंत्रणाकरिता मदत होणार- सीईपीआयचे सीईओ रिचर्ड हॅचेट पुढे म्हणाले की, भारत बायोटेक, सिडनी विद्यापीठ आणि एक्सेलजीन यांच्यासोबतची आमची भागीदारी भविष्यातील कोविड-19 च्या प्रकारांपासून संरक्षण करण्यासाठी आहे. संभाव्यत: व्हायरसच्या दीर्घकालीन नियंत्रणाकरिता मदत होणार आहे. भारत बायोटेकचे एमडी कृष्णा एला (डॉ. कृष्णा एला, व्यवस्थापकीय संचालक भारत-बायोटेक) यांनी सांगितले की, सध्या समोर आलेल्या लसींविरुद्ध सध्याच्या लसी सुरक्षित आणि प्रभावी आहेत. बहु-एपीटोप लसींसाठी नवनवीन शोध घेणे अत्यावश्यक आहे.

अत्यंत प्रभावी लस प्रदान करणे हे ध्येय- सिडनी विद्यापीठातील इन्स्टिट्यूट ऑफ इन्फेक्शियस डिसीजचे प्रोफेसर जेम्स ट्रिकास म्हणाले की, सध्याच्या आणि भविष्यातील SARS-CoV-2 प्रकारांचा सामना करण्यासाठी सुरक्षित, स्वस्त आणि अत्यंत प्रभावी लस प्रदान करणे हे आमचे ध्येय आहे. आमची आंतरराष्ट्रीय संघटना हे साध्य करण्यासाठी काम करत आहे. डॉ. मारिया जे. वर्म, सीईओ, एक्सेलजीन यांनी सांगितले की, आम्ही सध्या कोविड-19 साठी SARS-CoV-2 च्या प्रथिने प्रकारांपासून लस तयार करण्याचे प्रयत्न करत आहोत. त्याला सिडनी विद्यापीठ आणि भारत बायोटेकसह कोलिशन फॉर एपिडेमिक प्रिपेडनेस इनोव्हेशनकडून (CEPI) निधी आणि वैज्ञानिक सल्ला मिळणार आहे. आम्‍हाला आशा आहे आणि प्रथिने-आधारित लसींसाठी विज्ञानासाठी योगदान देऊ.

हेही वाचा-Vaccination : लवकरच लहान मुलांचे लसीकरण, 'या' वयाच्या मुलांना मिळणार लस

हेही वाचा-Bharat Biotech in Pune : पुणे तिथे काय उणे, आता भारत बायोटेक पुण्यात करणार लस निर्मिती

हेही वाचा-Bharat Biotech Nasal Booster Dose : भारत बायोटेकच्या इंट्रानेसल बूस्टर डोसच्या ट्रायलला DGCI ची परवानगी

Last Updated :May 11, 2022, 10:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.