ETV Bharat / bharat

Minor Girl Rape : अल्पवयीन मुलीची बलात्कार करून हत्या; कारवाईची मागणी करत संतप्त नागरिकांकडून पोलिसांवर दगडफेक

author img

By

Published : Mar 27, 2023, 8:30 PM IST

Updated : Mar 27, 2023, 8:50 PM IST

Rape of a minor girl
Rape of a minor girl

कोलकात्याच्या तिळजाला परिसरात एका सात वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मात्र, कारवाईला दिरंगाई होत असल्याचा आरोप करत परिसरातील नागरिकांनी अनेक वाहनांची तोडफोड व जाळपोळ केली आहे.

कोलकाता (पश्चिम बंगाल) : शेजारी राहणाऱ्या सात वर्षीय मुलीवर कोलकाता येथील तिलजाला परिसरात एका व्यक्तीने लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर सोमवारी स्थानिकांनी रस्त्यावर आणि रेल्वे मार्गावर आंदोलन करत पोलिसांच्या वाहनांची तोडफोड केली. पोलिसांनी सांगितले की, कुस्तिया भागातील श्रीधर रॉय रोडजवळ राहणारी मुलगी रविवारी सकाळपासून बेपत्ता होती आणि बराच शोध घेतल्यानंतर पोलिसांना तिचा मृतदेह परिसरातील एका अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये सापडला.

हेही वाचा : Sadhvi Prachi : विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांचे राहुल गांधींबद्दल वादग्रस्त विधान, म्हणाल्या...

दोषींवर कठोर कारवाईची मागणी : पोलिसांनी सांगितले की, फ्लॅट मालकाला अटक करण्यात आली असून, मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. बेपत्ता मुलीचा शोध घेण्यास पोलिसांनी दिरंगाई केल्याचा आरोप करत स्थानिक लोकांनी रविवारी रात्री तिळजाळा पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने करून अनेक वाहनांची तोडफोड करून जाळपोळ केली आहे. तसेच, दोषींवर कठोर कारवाईची मागणी केलीर आहे.

हेही वाचा : Amit Shah security: अमित शहांच्या सुरक्षेत त्रुटी! कर्नाटकातील दौऱ्यात संशयास्पद आढळलेल्या दोन तरुणांवर गुन्हा दाखल

प्रमुख ईएम बायपास आणि रेल्वे ट्रॅक रोखले : एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या तोडफोडीत सहभागी असल्याच्या आरोपावरून एका महिलेसह तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्या लोकांना सोडण्याच्या मागणीसाठी सोमवारी सकाळी स्थानिक लोकांनी तिळजाळा परिसरातील रस्ते रोखून धरले. दुपारी, त्यांनी दक्षिण सियालदह विभागातील प्रमुख ईएम बायपास आणि रेल्वे ट्रॅक रोखले, ज्यामुळे रस्ते वाहतूक आणि रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.

पोलिसांवरही दगडफेक : एका अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांच्या तीन वाहनांची तोडफोड करण्यात आली, तर एकाला आग लावण्यात आली. स्थानिकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलाचा मोठा ताफा आला असता त्यांनी पोलिसांवरही दगडफेक केली. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की आम्ही आंदोलकांशी बोलत आहोत आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.

हेही वाचा : Threat to CM Dhami: शिखर परिषदेबाबत मुख्यमंत्री धामी यांना धमकी, पोलीस झाले सतर्क

Last Updated :Mar 27, 2023, 8:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.