ETV Bharat / bharat

Jammu And Kashmir : सुरक्षा दलाकडून 12 तासांत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान

author img

By

Published : Jan 30, 2022, 8:15 AM IST

Updated : Jan 30, 2022, 8:26 AM IST

जम्मू-काश्मीरच्या पुलावामा आणि बडगाम जिल्ह्यामध्ये चकमकीत सुरक्षा दलांनी पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले ( Five TerroRist Killed Jammu kashmir ) आहे. या दहशतवाद्यांकडून दारुगोळा तसेच अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.

Pulwama and Budgam Encounter UPDATE
Pulwama and Budgam Encounter UPDATE

जम्मू - जम्मू-काश्मीरच्या पुलावामा आणि बडगाम जिल्ह्यामध्ये चकमकीत सुरक्षा दलांनी पाच दहशतवाद्यांना कंठस्नान ( Five TerroRist Killed Jammu kashmir ) घातले. हे दहशतवादी 'लष्करे-ए-तैयबा' ( Lashkar E Taiba ) आणि 'जैश-ए-मोहम्मद' ( Jaish E Mohammed ) या दहशतवादी संघटनेचे होते.

गेल्या 12 तासांत झालेल्या दोन चकमकीत 'जैश-ए-मोहम्मद'चा दहशतवादी जाहिद वानी आणि अन्य चार जण मारले गेले. हे आमच्यासाठी मोठे यश आहे, अशी माहिती आयजीपी यांनी दिली.

या दहशतवाद्यांकडून दारुगोळा, एके 56 रायफल आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. सुरक्षा दल आणखी दहशतवाद्यांचा शोध घेत असल्याचे काश्मीर झोन पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा - U19 World Cup 2022 : 'यंग इंडिया’ची उपांत्य फेरीत धडक! बांगलादेशवर ५ गडी राखून दणदणीत विजय

Last Updated : Jan 30, 2022, 8:26 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.