ETV Bharat / bharat

धक्कादायक! विषारी दारू पिऊन अलिगडमध्ये 8 जणांचा मृत्यू

author img

By

Published : May 28, 2021, 12:19 PM IST

विषारी दारू पिऊन अलिगडमध्ये 8 जणांचा मृत्यू
विषारी दारू पिऊन अलिगडमध्ये 8 जणांचा मृत्यू

करसुआ येथील ५ जणांचा आज सकाळच्या सुमारास मृत्यू झाला होता. त्यानंतर 3 जण अत्यवस्थ असल्याने त्यांना मेडिकल कॉलेजमध्ये भरती करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचाही मृत्यू झाला. घटनेचे गाभीर्य लक्षात घेता पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन गावातील गावठी दारूचा अड्डा सील केला आहे.

अलिगड - उत्तर प्रदेशमधील अलिगड जिल्ह्यातील करसुआ गावात विषारी दारू पिल्याने 8 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच इतर ५ जण अत्यवस्थ असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

करसुआ येथील ५ जणांचा आज सकाळच्या सुमारास दारू पिल्यामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर 3 जण अत्यवस्थ असल्याने त्यांना मेडिकल कॉलेजमध्ये भरती करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचाही मृत्यू झाला. घटनेचे गाभीर्य लक्षात घेता पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन गावातील गावठी दारूचा अड्डा सील केला आहे.

विषारी दारू पिऊन अलिगडमध्ये 8 जणांचा मृत्यू

अलिगडमध्ये करसुआ गावात गावठी दारू पिल्यानंतर मृत्यू झालेल्यांमध्ये २ ट्रक चालकांचा आणि ३ ग्रामस्थांचा समावेश आहे. तसेच शेजारच्या गावातील अन्य तिघाचा समावेश असल्याचे अलिगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच शेजारच्या अंडला गावात कोणाचा मृत्यू झाला नसल्याचे जिल्हाधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. गावात एकाच दारू विक्रेत्याची दोन दुकाने होती. त्या दुकांनांना पोलिसांनी सील ठोकले असून या मृत्यू प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

प्रकरणाची चौकशी करून कडक कारवाईचे मुख्यमंत्री योगींचे निर्देश-

अलिगडमध्ये दारूमुळे मृत्यू झाल्याच्या या प्रकरणावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अबकारी विभागाला चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे सक्त निर्देश दिले आहेत. तसेच ही विषारी दारू सरकारमान्य दुकानातून विकली गेली असेल तर त्याचा परवाना रद्द करण्याच्या सुचनाही मुख्यमंत्री योगींनी दिल्या आहेत. तसेच या प्रकरणातील दोषींची संपत्ती जप्त करून लिलावात काढा आणि मृतांच्या नातेवाईकांना मदत देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.