ETV Bharat / bharat

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमकडून 3 महिला न्यायाधीशांसह 9 जणांची शिफारस

author img

By

Published : Aug 18, 2021, 3:25 PM IST

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियममध्ये न्यायाधीश यु. यु. ललित, ए. एम. खानविलकर, डी. वाय. चंद्रचुड आणि एल. नागेश्वर राव यांचा समावेश आहे. या कॉलिजियमने तीन महिला न्यायाधीशांची शिफारस केल्याचे सूत्राने साांगितले.

महिला न्यायाधीश
महिला न्यायाधीश

नवी दिल्ली - सरन्यायाधीश एन. व्ही. रामणा यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलिजियमने तीन महिला न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयात बढती करण्याची शिफारस केली आहे. यामध्ये न्यायाधीश बी. व्ही. नागरत्ना (कर्नाटक दिल्ली उच्च न्यायालय), न्यायाधीश हिमा कोहली (तेलंगाणा उच्च न्यायालय) आणि न्यायाधीश बेला त्रिवेदी (गुजरात उच्च न्यायालय) यांचा समावेश आहे. या तिन्ही महिला न्यायाधीशांपैकी एका महिला न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आर. एफ. नरिमन हे 12 ऑगस्टला निवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीनंतर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 25 वर आली आहे. प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांसह न्यायाधीशांची 34 पदे मंजूर आहेत. तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगाई हे 19 मार्च 2019 रोजी निवृत्त झाल्यानंतर बढती होऊन सर्वोच्च न्यायालयात नवीन न्यायाधीशांची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात नवीन न्यायाधीशांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत.

हेही वाचा-खळबळजनक.. पुण्यात पोलीस आयुक्तालयाच्या दारातच एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न, ससूनमध्ये उपचार सुरू

महिला न्यायाधीश बी. व्ही. नागरत्न पुढील सरन्यायाधीश होण्याची शक्यता-

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियममध्ये न्यायाधीश यु. यु. ललित, ए. एम. खानविलकर, डी. वाय. चंद्रचुड आणि एल. नागेश्वर राव यांचा समावेश आहे. या कॉलिजियमने तीन महिला न्यायाधीशांची शिफारस केल्याचे सूत्राने साांगितले. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या महिला न्यायाधीश बी. व्ही. नागरत्न या पुढील सरन्यायाधीश होऊ शकतात, असे सूत्राने सांगितले.

हेही वाचा-सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात काँग्रेस नेते शशी थरूर यांची निर्दोष मुक्तता

इतर 9 जणांच्या शिफारशीमध्ये यांचा समावेश-

सुत्राच्या माहितीनुसार इतर नावांमध्ये अभय श्रीनिवास ओक (कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश), न्यायाधीश विक्रम नाथ (गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, न्यायाधीश जितेंद्र कुमार माहेश्वरी (सिक्किम उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश), न्यायाधीश सी. टी. रवीकुमार (केरळ उच्च न्यायालय) आणि न्यायाधीश एम. एम. सुंदरेश (केरळ उच्च न्यायालय) यांचा समावेश आहे.

हेही वाचा-काबूलमधून उड्डाण भरलेल्या विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये आणि चाकांमध्ये आढळले मृतदेह

दरम्यान, तत्कालीन सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश या महिला असण्याची वेळ आल्याचे म्हटले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.