Delhi - Mumbai Railway : कोटामध्ये वादळामुळे 25000 KV रेल्वेची तार तुटली, दिल्ली-मुंबई मार्गावरील वाहतूक 8 तास ठप्प

author img

By

Published : May 26, 2023, 6:21 PM IST

Delhi - Mumbai Railway

गुरुवारी रात्री आलेल्या वादळामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. वांद्रे ते श्री माता वैष्णो देवीकडे जाणाऱ्या जम्मू तावी स्वराज एक्सप्रेस 12471 च्या ओव्हरहेड उपकरणांचे (इलेक्ट्रिक वायर) नुकसान झाले. त्यानंतर 25000 KV मार्ग बंद झाल्याने रेल्वेत आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली होती.

कोटा (राजस्थान) : गुरुवारी रात्री उशिरा आलेल्या वादळात सुमारे 50 किमी वेगाने जोरदार वारे वाहत होते. वादळामुळे रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली आहे. वांद्रेहून श्री माता वैष्णोदेवीकडे जाणाऱ्या जम्मू तावी स्वराज एक्सप्रेस 12471 च्या ओव्हर हेड उपकरणाचे (ओएचई म्हणजे इलेक्ट्रिक वायर) नुकसान झाले. ही घटना रात्री साडे बाराच्या सुमारास घडली. यानंतर रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. येथे 25000 केव्ही लाइन बंद झाल्यानंतर रेल्वेमध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे.

अनेक गाड्या 6 ते 7 तास उशिराने धावत आहेत : ही माहिती मिळताच रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. घाईगडबडीत रेल्वेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून आदेश हाती घेतला. वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यासाठी रेल्वेचे तांत्रिक पथक मोठ्या पातळीवर विद्युत लाईन आणि खांबांच्या दुरुस्तीच्या कामात जुंपले. त्यानंतरही ही लाईन दुरुस्त करण्यासाठी अनेक तास लागले. सकाळी 8.00 च्या सुमारास वीजवाहिन्या पूर्ववत झाल्या आणि वाहतूक पूर्ववत होऊ शकली. मात्र, त्यामुळे सध्या अनेक गाड्या 6 ते 7 तास उशिराने धावत आहेत. त्याचबरोबर वळवलेल्या मार्गावरून अनेक गाड्याही चालवण्यात आल्या.

रेल्वेच्या पेंटोग्राफमध्ये विजेची तार अडकली : मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री जोरदार वादळ आले. दरम्यान, केशोराई पाटण ते कापरेण दरम्यान अर्नेठा स्थानकाजवळून ही गाडी जात होती. त्यानंतर रेल्वेच्या पेंटोग्राफमध्ये विजेची तार अडकली. ट्रेनचा वेग जास्त असल्याने वीज पुरवठा लाइन तुटली. यासोबतच काही विद्युत खांबही कोसळले. यानंतर संपूर्ण रेल्वे विभागाची वाहतूक ठप्प झाली. दिल्ली ते मुंबई आणि मुंबई ते दिल्ली या दोन्ही मार्गांवर गाड्यांची वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे प्रवाशांची चांगलीच फजिती झाली आहे. तसेच प्रवाशांना बसने प्रवास करावा लागत आहे.

हेही वाचा : 1. Project SMART of Railways: गृहनिर्माण अन् रेल्वे मंत्रालयाने जेआईसीए सोबत भागीदारी! प्रकल्पाअंतर्गत स्टेशन परिसरही विकसित

2. Sc On Discount In Railway Fares: ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे भाड्यात सवलत देता येणार नाही; सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.