ETV Bharat / bharat

17th G20Summit : बहुपक्षीय संस्था जागतिक आव्हानांचा सामना करण्यात अपयशी - पंतप्रधान मोदी

author img

By

Published : Nov 15, 2022, 11:03 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) सोमवारी G-20 शिखर परिषदेत ( 17th G20Summit ) सहभागी होण्यासाठी आणि जागतिक नेत्यांसोबतच्या द्विपक्षीय बैठकींसाठी बाली येथे दाखल झाले. येथे त्यांनी आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेतली. यादरम्यान दोन्ही नेते बराच वेळ एकमेकांशी चर्चा करताना दिसत आहेत.( PM Modi At Bali To Attend The 17th G20Summit )

17th G20Summit
G-20 परिषदेत पंतप्रधान मोदी

बाली : 17 व्या G20 शिखर परिषदेला (17th G20Summit ) उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) सोमवारी बाली येथे दाखल झाले. इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी त्यांचे स्वागत केले. बाली येथील अपूर्व केम्पिंस्की हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम आहे. G20 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान जागतिक नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठकींमध्ये सहभागी होणार आहेत.( PM Modi At Bali To Attend The 17th G20Summit )

विविध देशांच्या नेत्यांशी संवाद : दोन दिवसीय G-20 शिखर परिषदेला ( 17th G20Summit ) मंगळवारी सुरुवात झाली. त्यात अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह जगातील 20 प्रमुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांचे नेते सामील असतील. तत्पूर्वी, पंतप्रधान कार्यालयाने (PMO) ट्विट केले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी Modi जी-20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी इंडोनेशियाला पोहोचले आहेत. शिखर परिषदेत जागतिक आव्हानांचा सामना करण्यावर व्यापक चर्चा होणार आहे. शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान जगातील विविध देशांच्या नेत्यांशी संवाद साधतील.

द्विपक्षीय संबंधांमधील प्रगतीचा आढावा : बाली विमानतळावर पंतप्रधान मोदी यांचे पारंपारिक शैलीत जोरदार आणि रंगतदार स्वागत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितले की ते बाली येथे G20 गटाच्या नेत्यांशी जागतिक आर्थिक विकासाचे पुनरुज्जीवन, अन्न आणि ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करणे यासारख्या आव्हानांवर आणि आरोग्य आणि डिजिटल परिवर्तनाशी संबंधित समस्यांवर विस्तृत चर्चा करतील. चीनचे राष्ट्राध्यक्षशी जिनपिंग, अमेरिकेचे अध्यक्ष बिडेन, ब्रिटनचे पंतप्रधान सुनक आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे देखील या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. G-20 शिखर परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर ते इतर अनेक सहभागी देशांच्या नेत्यांना भेटतील आणि त्यांच्यासोबत भारताच्या द्विपक्षीय संबंधांमधील प्रगतीचा आढावा घेणार असल्याचे मोदी म्हणाले.

समस्यांचे निराकरणावर चर्चा : दोन दिवसीय G20 शिखर परिषद सुरू झाली आहे. त्यात अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह जगातील 20 प्रमुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या नेत्यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितले की ते बाली येथे G20 गटातील नेत्यांशी जागतिक आर्थिक विकासाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी, अन्न आणि ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि आरोग्य आणि डिजिटल परिवर्तनाशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी विस्तृत चर्चा करतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.