ETV Bharat / bharat

125 Feet statue of Dr Ambedkar : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १२५ फूट उंच पुतळा हैदराबादमध्ये उभारण्यात येणार

author img

By

Published : Apr 13, 2022, 6:35 PM IST

2022 च्या अखेरीस तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 फूट उंच पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे. हा जगभरातील आंबेडकरांच्या पुतळ्यांपैकी हा सर्वात उंच पुतळा ठरणार आहे. हा पुतळा हैदराबाद शहराच्या मध्यभागी असलेल्या हुसेन सागर तलावाजवळ ( Dr Ambedkar statue  hussain sagar ) बांधला जात आहे. राज्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे पुत्र टी रामाराव ( KTR on Dr Ambedkar statue ) यांच्या माहितीनुसार 2022 च्या अखेरीस या पुतळ्याचे अनावरण केले जाईल.

125  Feet statue of Dr Ambedkar
बाबासाहेब आंबेडकर यांचा १२५ फूट उंच पुतळा

हैदराबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित ( 125 foot tall statue of Dr Ambedkar ) तेलंगाणा सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १२५ फूट उंच पुतळा हैदराबादमध्ये उभारण्यात ( tallest statues of Dr Ambedkar ) येणार आहे. अनेक राज्यांमध्ये देशातील महापुरुषांचे उंच पुतळे बसवले जात आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १२५ फूट उंचीचा पुतळा तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्येही बसविला जात आहे.

2022 च्या अखेरीस तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 फूट उंच पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे. हा जगभरातील आंबेडकरांच्या पुतळ्यांपैकी हा सर्वात उंच पुतळा ठरणार आहे. हा पुतळा हैदराबाद शहराच्या मध्यभागी असलेल्या हुसेन सागर तलावाजवळ ( Dr Ambedkar statue hussain sagar ) बांधला जात आहे. राज्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे पुत्र टी रामाराव ( KTR on Dr Ambedkar statue ) यांच्या माहितीनुसार 2022 च्या अखेरीस या पुतळ्याचे अनावरण केले जाईल.

पुतळ्याचे 90 ते 95 टक्के काम पूर्ण-महापालिका प्रशासन आणि नगरविकास मंत्री केटी रामाराव (KTR ) यांनी बुधवारी समाजकल्याण मंत्री कोप्पुला ईस्वार यांच्यासमवेत 150 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या बाबासाहेबांच्या कास्य पुतळ्याच्या कामकाजाचा आढावा घेतला. हा पुतळा 50 फुटांच्या कठड्यावर बसविण्यात येणार आहे. केटीआर म्हणाले की, पुतळ्यासाठी पाया तयार करण्याचे 90-95 टक्के काम पूर्ण झाले आहे. हा पुतळा 45 फूट रुंद असणार आहे.

सुमारे 11 एकर जागा पर्यटनासाठी विकसित - पुतळ्याच्या कामात नऊ टन कांस्य आणि १५५ टन स्टेनलेस स्टीलचा वापर केला जाणार आहे. केटी रामाराव (KTR) यांनी सांगितले की डॉ. बी. आर. आंबेडकर पुतळ्याभोवती सुमारे 11 एकर जागा पर्यटनासाठी विकसित केली जाणार आहे. ते केवळ तेलंगणातील लोकांसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान असणार आहे. याशिवाय डॉ.आंबेडकरांचे जीवन व कार्य येथे संग्रहालय, छायाचित्र गॅलरी आणि ग्रंथालयाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्याजवळ ध्यान केंद्र आणि सभामंडपही बांधण्यात येणार आहे. केटीआर म्हणाले की, पुतळ्याच्या बांधकामावर समाजकल्याण मंत्री नियमितपणे देखरेख ठेवत आहेत.

हे मुख्यमंत्र्यांचे स्वप्न -पुतळ्याजवळ विकसित होत असलेल्या पर्यटन स्थळामध्ये स्वच्छतागृह, कॅन्टीन आणि पार्किंग अशा सर्व सुविधा असणार आहेत. केटीआर म्हणाले की, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे डॉ. आंबेडकरांच्या पावलावर पाऊल ठेवून सर्व स्तरातील लोकांच्या कल्याणासाठी काम करत आहेत. डॉ.आंबेडकरांचा सर्वात उंच पुतळा उभारणे हे मुख्यमंत्र्यांचे स्वप्न असल्याचे ते म्हणाले.

2022 च्या अखेरीस होणार पुतळ्याचे अनावरण-14 एप्रिल 2016 रोजी डॉ. आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने त्यांनी या प्रकल्पाची पायाभरणी केली होती. हा प्रकल्प 14 एप्रिल 2017 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. परंतु या कामाला 5 वर्षे विलंब झाला आहे. या पुतळ्याचे काम पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी चीन आणि सिंगापूरसारख्या विविध देशांना अभ्यास भेटी दिल्या आहेत. 2022 च्या अखेरीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे.

हेही वाचा-Dr Babasaheb Ambedkar Memorial : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिलमधील स्मारकाचे काम धीम्या गतीने

हेही वाचा-Ramdas Athavale : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणुकांना परवानगी द्यावी; मंत्री आठवलेंची मागणी

हेही वाचा-Ambedkar jayanti 2022 - ..तोपर्यंत पाणी पिणार नाही.. दलित बांधवांच्या या भूमिकेने ती विहीर झाली ऐतिहासिक, वाचा..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.