महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

ओणम सणानिमित्त शुभांगी अत्रेनं घडवली केरळच्या दृश्यांची सफर

अभिनेत्री शुभांगी अत्रेनं ओणम सणानिमित्त केरळमधील फोटो शेअर केले आहेत. चाहते तिचे फोटो खूप पसंत करत आहेत.

shubhangi Atre
शुभांगी अत्रे (IANS)

By ETV Bharat Entertainment Team

Published : August 26, 2026 at 5:18 PM IST

हैदराबाद :टीव्ही अभिनेत्री शुभांगी अत्रेनं आपल्या चाहत्यांना केरळच्या दृश्यांची सफर घडवली आहे. तसेच तिनं ओणमचा सण साजरा केला असून या राज्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, पारंपरिक कलाप्रकार आणि उत्साही उत्सव दर्शवणारे फोटोही आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. तिनं शेअर केलेल्या फोटोंच्या मालिकेत कथकली कलाकारांसोबतचे फोटो, शास्त्रीय नृत्य-नाट्य प्रकाराशी संबंधित पारंपरिक वेशभूषा आणि वैशिष्ट्यपूर्ण रंगभूषेची झलक पाहायला मिळते.

शुभांगी अत्रेनं ओणम सणानिमित्त शेअर केले विशेष फोटो : एका फोटोमध्ये शुभांगी दोन कथकली कलाकारांच्या मध्ये उभी असल्याची राहून पोझ देताना दिसत आहे. याशिवाय इतर फोटोंमध्ये कलाकार सादरीकरण करताना दिसत आहेत. तिनं केरळची पारंपरिक युद्धकला 'कलारीपयट्टू', तसेच रंगीबेरंगी फुलांची सजावट आणि राज्याच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांची झलकही शेअर केली. या पोस्टला कॅप्शन देताना शुभांगी लिहिलं, 'केरळ माझ्या नजरेतून, परंपरा, कला, रंग आणि विविध स्वादांचा एक सुंदर मिलाफ. कथकलीचे मंत्रमुग्ध करणारे हावभाव आणि कलारीपयट्टूची प्रभावी लयबद्धता ते रंगीबेरंगी रांगोळीच्या नक्षी आणि केरळी खाद्यपदार्थांची लज्जत. प्रत्येक क्षण हा संस्कृती आणि जीवनाचा उत्सव वाटला. हा प्रवास अत्यंत आनंददायी होता आणि यात असे अनेक क्षण आहेत जे मी कायम लक्षात ठेवेन.'

शुभांगी अत्रेबद्दल : केरळचा कापणीचा सण असलेल्या 'ओणम'च्या निमित्तानं अभिनेत्रीची ही पोस्ट आता चर्चेत आली आहे. अनेकजण तिचे फोटो पसंत करत आहेत. दरम्यान, शुभांगीबद्दल सांगायचं झालं तर ती जवळपास दोन दशकांपासून भारतीय टेलिव्हिजनवर काम करत आहे. तिनं 'कसौटी जिंदगी की' या मालिकेतून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. यानंतर ती एकता कपूरच्या 'कस्तुरी' या मालिकेत दिसली. या मालिकेनंतर ती प्रसिद्धीझोतात आली. यात तिनं करण पटेलबरोबर काम केल होतं. त्यानंतर तिनं 'हवन','अधूरी कहानी हमारी', 'चिडिया घर' आणि 'दो हंसों का जोडा' यांसारख्या मालिकांमध्येही काम केलं. मात्र, 'भाभीजी घर पर हैं!'मधील 'अंगूरी भाभी'च्या भूमिकेमुळं ती घराघरात लोकप्रिय झाली. दरम्यान शुभांगीनं 'भाभीजी घर पर हैं!' या मालिकेत शिल्पा शिंदेच्या जागी ही भूमिका स्वीकारली होती. शुभांगीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर 2003 मध्ये तिनं पियुष पुरी यांच्याशी विवाह केला आणि त्यांना 'आशी' नावाची मुलगी आहे. अनेक वर्ष एकत्र राहिल्यानंतर हे जोडपे वेगळे झाले. शुभांगीनं 2023मध्ये त्यांच्या विभक्त होण्याबाबत सांगितलं होतं. घटस्फोट झाल्याच्या काही दिवसानंतर पियुष पुरीचं निधन झालं.

हेही वाचा :

  1. टीव्ही अभिनेत्री शुभांगी अत्रेनं मनोरंजन क्षेत्रातील तिच्या प्रवासाविषयी केलं भाष्य...
  2. Exclusive Interview : शुभांगी अत्रे - मनापासून आणि सतत प्रयत्न केल्यास आपण पर्यावरणात मोठा बदल घडवू शकतो!
  3. घटस्फोटाच्या 2 महिन्यानंतर 'भाभीजी घर पर हैं' फेम शुभांगी अत्रेच्या एक्स पतीचं झालं निधन...