महाराष्ट्र

maharashtra

निलेश घायवळचे रिल्स व्हायरल; पुणे पोलिसांच्या आदेशाला 'भाई लोकांच्या' कार्यकर्त्यांची केराची टोपली

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 8, 2024, 12:09 PM IST

पुणे Pune Crime News : दोन दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी शहरातील सर्वच टोळी प्रमुख तसंच त्यांच्या कार्यकर्त्यांना बोलावून परेड घेत सोशल मीडियावर गुन्हेगारांचं उदात्तीकरण करणाऱ्या रिल्स यापुढं टाकू नये असे आदेश दिले होते. मात्र असं असताना देखील पुणे पोलिसांच्या आदेशाला भाई लोकांच्या कार्यकर्त्यांकडून केराची टोपली दाखवण्यात आली. सोशल मीडियावरील इंन्स्टाग्रामवर दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणारे रिल्स अद्यापही सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. गुन्हेगार, गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे रिल्स, व्हिडिओ, गुंडांनी किंवा गुंडांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर पोस्ट करायचं नाही, अशी सक्त ताकीद पोलिसांनी दिली होती. पुणे पोलिसांनी हे जाहीरपणे सांगून देखील काही तासातच गुन्हेगारांच्या सोशल मीडिया अकाउंटवर गुंड निलेश घायवळचे दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणारे रिल्स अपलोड झाल्याचं समोर आलं आहे. आता पोलीस यावर काय ॲक्शन घेतात हे पाहावं लागणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details