महाराष्ट्र

maharashtra

केवळ भाजपाच्या श्रेष्ठींना दाखवण्यासाठी अजित दादांचा सर्व खटाटोप सुरू - रोहित पवार

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 5, 2024, 8:07 PM IST

बीड: बारामतीत भाषण करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता लोक भावनिक करतील. भावनेला बळी पडू नका. एवढे दिवस त्यांना साथ दिली, आता आम्हाला साथ द्या, असं आवाहन केलं होतं. (Ajit Pawar) यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पलटवार केला आहे. (Lok Sabha Election 2024) आम्हाला माहीत असलेले दादा आणि आताचे दादा हे फार वेगळे आहेत. केवळ भाजपाच्या श्रेष्ठींना दाखवण्यासाठी हा सर्व खटाटोप त्यांच्याकडून सुरू आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्याच कुटुंबातील एखादा व्यक्ती त्यांच्या पक्षाकडून उमेदवार म्हणून येऊ शकतो, याची खात्री आम्हाला पटली आहे. त्यांना विजयाची शाश्वती नसल्यानं जातात ते अशा पद्धतीचं वक्तव्य करतात.  बारामतीतील जनता ही पवार साहेबांसोबतच असल्याचं आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे. ते बीडमध्ये माध्यमांशी  बोलत होते.

ABOUT THE AUTHOR

...view details