महाराष्ट्र

maharashtra

राहुल गांधी यांच्या 'त्या' वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक, पुण्यात आंदोलन

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 9, 2024, 4:16 PM IST

पुण्यात आंदोलन

पुणे BJP Protest In Pune : काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी काल (8 फेब्रुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाती विषयी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभर भाजपाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. (Protest against Rahul Gandhi) त्यांच्याकडून राहुल गांधींविरोधात आंदोलन केलं जातं आहे. पुण्यात देखील आज (9 फेब्रुवारी) भाजपाच्यावतीनं बालगंधर्व चौकात आंदोलन करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांच्या वतीनं राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले.

राहुल गांधींकडून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न: यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष नामदेव माळवदे म्हणाले की, राहुल गांधी हे सातत्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाती विषयी संभ्रम निर्माण करून एकसंध हिंदू समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. (Controversial statement about Modi) काही लोकांना खुश करण्यासाठी ते अशा पद्धतीनं वक्तव्य करत आहेत. त्यांचं वक्तव्य हे विघातक वृत्तीचं असून आम्ही राहुल गांधी यांचा निषेध करत आहोत. यावेळी माळवदे यांना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सातत्यानं ओबीसी बाबत वक्तव्य करत आहेत. त्याबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details