महाराष्ट्र

maharashtra

राहुल नार्वेकरांच्या निर्णयाला आव्हान देणारी ठाकरे गटाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने टाकली लांबणीवर

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 13, 2024, 5:20 PM IST

Thackeray groups plea : शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार अपात्र करावे यासाठी सभापती राहुल नार्वेकरांच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या खटल्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात 12 फेब्रुवारी आली असता वेळे अभावी लांबणीवर टाकण्यात आली आहे.

Etv Bharat
Etv Bharat

मुंबई - Thackeray groups plea : राज्याच्या विधी मंडळातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं दाखल केलेली आमदार अपात्रता याचिका सभापती राहुल नार्वेकर यांनी फेटाळून लावली होती. नार्वेकरांच्या याचिका फेटाळून लावण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात आली असता सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायाधीश जे. बी. पार्डीवाला, न्यायाधीश मानोज मिश्रा यांच्या खंडपीठाने या खटल्याची सुनावणी लांबणीवर टाकली आहे. 12 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने वेळे अभावी ही सुनावणी पुढील काही दिवसांत होईल असे संकेत दिले आहेत.



राज्यात शिवसेना कोणाची याचा मोठा संघर्ष जनतेने मागील वर्षात पाहिला होता. आता त्याचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. राज्याच्या विधिमंडळात सुनावणी घेण्यासाठी सभापतींनी दोन वर्षे वेळ घेतला. ठाकरे गटाने एकनाथ शिंदे गटाला अपात्र करावे अशी मागणी विधिमंडळात केली होती. सभापती राहुल नार्वेकर यांनी वेळेत सुनावणी घ्यावी यासाठी ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केला. न्यायालयाने आदेश दिल्या नंतर सभापती यांनी अपात्रता सुनावणी विधिमंडळात घेतली. ही सुनावणी 10 जानेवारी 2024 रोजी घेतली. मात्र शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र केलेच नाही. त्यामुळे ठाकरे गटाने सभापती राहुल नार्वेकर यांच्या निर्णया विरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्या खटल्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात 12 फेब्रुवारी आली असता वेळे अभावी लांबणीवर टाकली आहे.



उबाठा गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी सभापती राहुल नार्वेकरांकडे शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र करा म्हणून विधिमंडळात याचिका दाखल केली होती.
मात्र सभापती यांनी निर्णय वेगळा दिला. दोन्ही गटाच्या आमदारांना अपात्र घोषित केले नाही. तेव्हा शिंदे गटाने मुंबई उच्च न्यायालयात खटला दाखल केला होता. तर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केला होता. उच्च न्यायालयात देखील शिंदे गटाची याचिका तातडीने सुनावणीस आलीच नाही. तर सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाची याचिका देखील अद्याप सुनावणीस घेतलेली नाही. आज वेळ आली होती मात्र इतर न्यायालयीन कामकाजा अभावी ही सुनावणी होऊ शकली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने शुक्रवारी कदाचित खटल्याची सुनावणी होऊ शकेल असे संकेत दिले आहेत.

हेही वाचा -

  1. माजी मुख्यमंत्र्यांच्या हजेरीत माजी मुख्यमंत्र्यांचा भाजपा प्रवेश; म्हणाले, "आदर्श घोटाळा हा राजकीय अपघात"
  2. आधी विखे अन् आता चव्हाणही गेले; 'वंचित'ची वेगळीच व्यथा, पडला 'हा' मोठा प्रश्न
  3. अशोकराव चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर विजय वडेट्टीवारांसह काय म्हणाले काँग्रेसचे आमदार?

ABOUT THE AUTHOR

...view details