महाराष्ट्र

maharashtra

भाजपा आमदार गणपत गायकवाड आणखी अडचणीत, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 4, 2024, 6:25 PM IST

BJP MLA Ganpat Gaikwad : भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

BJP MLA Ganpat Gaikwad
BJP MLA Ganpat Gaikwad

ठाणेBJP MLA Ganpat Gaikwad :शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर 'हिल लाइन' पोलीस ठाण्यातच गोळीबार करणारे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यावर हिल लाईन पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार गणपत गायकवाड यांच्यासह आठ जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या न्यायालयानं गणपत गायकवाड यांना 14 फेब्रुवारीपर्यंत 11 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

आठ जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा :कल्याण पूर्वेचे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर शनिवारी केलेल्या गोळीबारानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावात जमिनीच्या वादातून आमदार गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याचं उघड झालं आहे. आता त्यांच्याविरुद्ध हिल लाइन पोलीसांनी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. द्वारली गावातील जाधव या शेतकऱ्यानं गणपत गायकवाड यांच्याविरूद्ध फिर्याद दिली आहे.

जमिनीच्या वादातून गोळीबार : कल्याण पूर्वेतील अंबरनाथ तालुक्यातील महसूल हद्दीतील द्वारली गावात कौटुंबिक जमिनीचा वाद होता. या जमिनीचा वाद न्यायालयातही गेला. या जमिनीच्या वादाचा निकाल आमदार गायकवाड यांच्या बाजूनं लागला होता. यानंतर आमदार गायकवाड यांनी संबंधित जागेवर संरक्षण भिंत बांधण्यास सुरुवात केली होती. 31 जानेवारी रोजी दुपारी 1.00 वाजता आमदार गणपत गायकवाड यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. त्यामुळं त्यांच्यासह जितेंद्र पारीक, विठ्ठल चिकनकर, शिवाजी फुलोरे, सौरभ सिंग, छोटू खान, चंद्रकांत ओल, नागेश वारघे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडं गोळीबारानंतर सध्या पोलीस कोठडीत असलेले आमदार गायकवाड यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाल्यानं त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

काय म्हटलं आहे तक्रारीत?-अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील नीता एकनाथ जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की, 31 जानेवारी रोजी गणपत गायकवाडसह इतरांनी आमच्या जागेवर संरक्षण भिंत बांधण्याचं काम सुरू केलं होतं. आम्ही त्यांना जाब विचारला असता, आमदार गणपत गायकवाड यांनी आम्हाला मारण्यासाठी फावडं उचललं. त्यानंतर जातिवाचक शिवीगाळ करण्यात आली. तुमच्या जमिनीसाठी तुम्ही कोणत्याही न्यायालयात जा, असं जाधव यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

  • शेतकऱ्यांकडून सुरक्षेची मागणी :जाधव कुटुंबीयांच्या जमिनीवरून आमदार गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात महेश गायकवाड, राहुल पाटील, चैनू जाधव यांच्या दिशेनं गोळीबार केला होता. त्यामुळं आमचा जीवाला धोका असून सरकारनं आम्हाला सुरक्षा द्यावी, अशी मागणी जाधव कुटूंबीयांनी केली आहे.

हे वाचलंत का :

  1. पंतप्रधानांच्या हस्ते कोस्टल रोडचं उद्घाटन होण्यापूर्वी आदित्य ठाकरेंचा महायुतीवर हल्लाबोल, काय केला आरोप?
  2. अरविंद केजरीवालनंतर गुन्हे शाखेचे पथक पोहोचले आतिशींच्या घरी, आमदारांच्या घोडेबाजारप्रकरणी बजावणार नोटीस
  3. उद्धव ठाकरे परत युतीत आले तर, रामदास आठवलेंनी स्पष्टच सांगितलं काय घेणार निर्णय

ABOUT THE AUTHOR

...view details