महाराष्ट्र

maharashtra

देशसेवेचा असाही आदर्श; झेंड्यांना मोफत ड्रायक्लिन करून देतात कोल्हापूरच्या ताई

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 25, 2024, 9:26 PM IST

Updated : Jan 25, 2024, 11:04 PM IST

Republic Day 2024 : गेली एक तप ड्रायक्लिनच्या दुकानात स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त येणाऱ्या झेंड्यांना स्वच्छ धुऊन आणि इस्त्री करून देण्याचं काम कोल्हापूरच्या रोहिणी कमते करत आहेत. (Free Dryclean to Flag) विशेष म्हणजे, यासाठी कोणत्याही प्रकारचा मोबदला त्या घेत नाहीत. (Republic Day 2024) अशा पद्धतीनं देशसेवा अधोरेखित करून सर्वांसमोर आदर्श निर्माण करणाऱ्या रोहिणी कमते यांच्या देश प्रेमावर प्रजासत्ताक दिनानिमित्त 'ईटीव्ही भारत'चा प्रकाशझोत. वाचा सविस्तर बातमी...

Rohini Kamase of Kolhapur
रोहिणी कमते

कोल्हापूर Republic Day 2024 : 75 वर्षांपूर्वी आपला देश प्रजासत्ताक झाला. आम्ही भारताचे नागरिक म्हणून 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. तेव्हापासून 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन देशात साजरा केला जातो. देशवासियांकडून देशाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. अनेक जण या दिवशी देशाप्रती भावना व्यक्त करत असतात.

झेंड्याला मोफत ड्रायक्लिन : कोल्हापुरातल्या बिनखांबी गणेश मंदिराजवळ असलेल्या छोट्या ड्रायक्लिनचे दुकान सांभाळणाऱ्या रोहिणी कमते यांचं देशप्रेम जगावेगळं म्हणावं लागेल. वडिलोपार्जित ड्रायक्लिन व्यवसाय 2011 पासून सांभाळत असलेल्या रोहिणी कमते भारतीय स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दुकानात येणाऱ्या सहकारी संस्था, बँका, शाळा, महाविद्यालय, वैयक्तिक भारतीय ध्वज म्हणजेच झेंड्यांना स्वच्छ धुऊन कडक इस्त्री करून देतात. विशेष म्हणजे या सर्व कामाचा त्या कोणताही मोबदला गिऱ्हाईकाकडून घेत नाहीत.

आमचं दुकान शोधत येतात ग्राहक : स्वातंत्र्य दिनाच्या आणि प्रजासत्ताक दिनाच्या आधी चार ते पाच दिवस रोहिनी कमते यांच्या दुकानात तुडुंब गर्दी होते. वडिलांचा व्यवसाय सांभाळत असल्यानं अनेक गिऱ्हाईकांशी त्यांचे ऋणानुबंध निर्माण झाले आहेत. अगदी साठीच्या पुढचे कोल्हापुरातील नागरिक त्यांचं दुकान शोधत बिनखांबी गणेश मंदिर परिसरात येतात. गिऱ्हाईकांकडून वडिलांचा वारसा चालवत असल्याबद्दल समाधान व्यक्त होतं. याबरोबरच नागरिक हे मोफत स्वच्छ धुतलेला आणि इस्त्री केलेला भारतीय ध्वज घेऊन जाताना समाधान व्यक्त करतात, अशा भावना कमते यांनी व्यक्त केल्या. देशातील कोणताही नागरिक आपल्या कामातून देशाप्रती आदर व्यक्त करत असतो. झेंडे मोफत धुऊन आणि इस्त्री करून देऊन आपणही देशसेवा करत असल्याचं समाधान मिळत असल्याच्या भावना रोहिणी कमते यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केल्या.

40 वर्षांपासून ड्रायक्लिनचा व्यवसाय : वडील शामराव पाटील यांना सहा मुली. मुलींचं शिक्षण, लग्न या व्यवसायावरच वडिलांनी पूर्ण केले. 2011 यावर्षी वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या व्यवसायाची जबाबदारी रोहिणी अमरसिंह कमते यांच्यावर आली. वडिलांचा व्यवसाय सांभाळत आपल्या कुटुंबालाही रोहिणी कमते हातभार लावत आहेत. दुकानात येणाऱ्या प्रत्येकाशी हसतमुखाने संवाद साधत जुन्या जाणत्या गिर्‍हाईकांकडून वडिलांच्या आठवणी जागवत कोल्हापुरातील बिनखांबी गणेश मंदिर परिसरात त्या आपला यशस्वी व्यवसाय करत आहेत.

शिक्षणानंतर वडिलांचा व्यवसाय सांभाळला :सहा मुलींचा सांभाळ करताना आई आणि वडिलांची तारेवरची कसरत व्हायची. तरीही जिद्दीनं वडिलांनी रोहिणी यांच्यासह अन्य मुलींना चांगलं शिक्षण दिलं. रोहिणी यांनी बीएस्सीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर वैवाहिक जीवनात स्थिरावत असतानाच वडिलांनी जगाचा निरोप घेतला. पुढे वडिलांच्या व्यवसायाची पूर्ण जबाबदारी खांद्यावर घेत त्यांनी ड्रायक्लिनचा व्यवसाय यशस्वीपणे सांभाळून आजच्या स्त्रियांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

हेही वाचा:

  1. मनोज जरांगे पाटलांना मुंबई पोलिसांनी बजावली नोटीस; 'मुंबईतील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता'
  2. मराठा समाज आक्रमक; उपमुख्यमंत्री अजित पवारांना दाखवले काळे झेंडे
  3. मग असं बोलताना राऊतांना लाज कशी वाटत नाही? नितेश राणेंचा राऊत कुटुंबावर हल्लाबोल
Last Updated : Jan 25, 2024, 11:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details