महाराष्ट्र

maharashtra

मुंबईतील अनधिकृतपणे राहणाऱ्या बांगलादेशी, रोहिंग्यांचा बंदोबस्त करणार; 'त्या' घटनेनंतर पालकमंत्री लोढा आक्रमक - Mumbai Crime

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 29, 2024, 2:38 PM IST

Mumbai Crime News : मुंबईतील मानखुर्द परिसरात एका 27 वर्षीय तरुणीची हत्या करुन तिचा मृतदेह एका सुटकेसमध्ये टाकण्यात आल्याची घटना समोर आलीय. यातील मृत तरुणीच्या घरी मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी भेट दिलीय.

Mumbai Crime News
मुंबईतील अनधिकृतपणे राहणाऱ्या बांगलादेशी, रोहिंग्यांचा बंदोबस्त करणार; 'त्या' घटनेनंतर पालकमंत्री लोढा आक्रमक

मंगल प्रभात लोढा


मुंबई Mumbai Crime News : मुंबईतील मानखुर्द परिसरात लव जिहादची घटना समोर आल्याचा आरोप करत मुंबईत अनधिकृतपणे राहणाऱ्या बांगलादेशी आणि रोहिंग्याचा बंदोबस्त करणार, अशी प्रतिक्रिया मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिलीय. तर भाजपाचे नेते किरीट सोमैय्या यांनीही पीडित महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केलंय. मुंबईतील मानखुर्द येथे राहणाऱ्या एका तरुणीची हत्या करुन तिचा मृतदेह एकाच सुटकेसमध्ये टाकण्यात आल्याची माहिती समोर आली. एका टॅक्सी ड्रायव्हरनं हा खून केल्याची कबुली दिलीय. त्यामुळं ही लव जिहादची घटना असून अशा पद्धतीनं घटना वाढत असल्यानं आता मुंबईत अनधिकृतपणे राहणाऱ्या बांगलादेशी आणि रोहिंग्याचा बंदोबस्त करावा लागणार आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिलीय.

कल्याण मध्ये केली तरुणीची हत्या : मानखुर्दमध्ये राहणारी 27 वर्षीय तरुणी मानखुर्द वरुन सॅडहर्स्ट रोड इथं कामानिमित्त जात होती. यादरम्यान, तिचा एका टॅक्सी ड्रायव्हरशी संपर्क आला आणि या संपर्काचं प्रेमात रुपांतर झालं. चालकानं 18 एप्रिल रोजी तिचं अपहरण केलं. तिला कल्याण इथं घेऊन गेला. तिथं तिला पाण्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न केला. यात ती मरण पावल्याचं लक्षात येताच तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करुन सुटकेसमध्ये भरुन निर्जन स्थळी सोडण्यात आले असंही लोढा यांनी सांगितलं. दोन दिवसांपूर्वी ही घटना उघडकीस आली असून हा लव जिहादचा प्रकार असल्याचा आरोप स्थानिकांनी केला असल्याचं लोढा म्हणाले.

पीडित तरुणीच्या कुटुंबीयांची भेट :मंत्री लोढा यांनी पीडित तरुणीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं तसंच दोषीला कठोर शिक्षा होण्यासाठी आपण पूर्णपणे प्रयत्न करू असं आश्वासन त्यांनी कुटुंबीयांना दिलंय. मुंबईतील ही तिसरी लागोपाठची घटना असून त्यामुळं पोलिसांनी याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असंही लोढा यावेळी म्हणाले. पीडित तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकारचा एक घटक म्हणून आपण स्वतः प्रयत्न करणार आहोत. 24 तासांच्या आत आरोपीवर कठोर कारवाई झाली नाही, तर उग्र आंदोलन करण्याचा इशाराही मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिलाय. मुंबईत अनधिकृतपणे राहणाऱ्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांमुळे या घटना घडत आहेत. अशा लोकांचा ताबडतोब बंदोबस्त करावा लागणार असल्याचं ते म्हणाले.

किरीट सोमैय्या यांनीही घेतली कुटुंबीयांची भेट : भाजपाचे नेते किरीट सोमैय्या यांनी सुद्धा मानखुर्द इथं जाऊन पीडित तरुणीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. ही घटना अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक आहे. या घटनेचा आपण निषेध करत असून या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याशी चर्चा केली असून गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचं किरीट सोमैय्या यांनी सांगितलंय.

हेही वाचा :

  1. नात्यातील ओलावा आटला : मोठ्या भावाकडून लहान भावाची हत्या, तर बहिणीनं सुपारी देऊन भावाचा काढला 'काटा' - Nagpur Crime
  2. दिल्लीत दोन मुलांची हत्या, आईची प्रकृती चिंताजनक, पती फरार - Delhi Crime

ABOUT THE AUTHOR

...view details