महाराष्ट्र

maharashtra

"मी माझ्या आजोबांना सोडून जाणार नाही"; आमदार रोहित पवारांचा स्पष्ट निर्धार

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 11, 2024, 3:16 PM IST

MLA Rohit Pawar on ED : मला कधीही अटक होण्याची शक्यता असल्याचं वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केलंय. तसंच मी माझ्या आजोबांना सोडून जाणार नाही असा निर्धारही त्यांनी केलाय. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते.

"मी माझ्या आजोबांना सोडून जाणार नाही"; आमदार रोहित पवारांचा स्पष्ट निर्धार
"मी माझ्या आजोबांना सोडून जाणार नाही"; आमदार रोहित पवारांचा स्पष्ट निर्धार

आमदार रोहित पवार

छत्रपती संभाजीनगर MLA Rohit Pawar on ED : "माझ्यावर एकच कारवाई बाकी आहे, ती म्हणजे अटकेची, त्यामुळं मला अटक होण्याची शक्यता आहे. काहीही केलं तरी मी घाबरणार नाही," असं सूचक वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केलंय. ते आज छत्रपती संभाजीनगरात बोलत होते. मी त्यांच्या सोबत जाईन असं वाटत असेल, मी लोकसभेत प्रचार करु नये असं त्यांना वाटतं. मात्र माझा लढा पुढे सुरू राहणार असल्याचा इशाराही आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना दिलाय. मी माझ्या आजोबांना सोडून जाणार नाही, दिल्लीपुढं मराठी माणूस झुकला नाही आणि झुकणार पण नाही, असं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलय.

आजोबांसोबत राहीन :यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले, "लोकांना वाटत होत आम्ही येणार नाही, मात्र मी कोणाला घाबरत नाही. काय करायचं ते करा. तुमच्या कुटुंबावर संकट आलं तर त्यांना सोडून जाणार का? आपली संस्कृती कशी आहे. हा नातू आपल्या अजोबला सोडून जाणार नाही, सोबत राहणार. महापुरुषांचा आदर्श समोर आहे. ज्यांनी थोर व्यक्तीचा अवमान केला त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता. सत्तेसाठी जाता, का गेलात आम्हाला माहीत आहे. स्वतःच्या हितासाठी जायचं का? तर नाही. मग मी जाणार नाही. मागच्या महिन्यात मला ईडी ने बोलावलं. मी गेलो कागदपत्रं दाखवली, त्यांनी विचारलं ते सांगितलं. कन्नड मधील करखान्याबाबत मी माहिती देऊनही लोकसभा निवडणुकीच्या आधी नोटीस दिली. त्यांना वाटतं की मी त्यांच्या सोबत जावं, प्रचारासाठी फिरू नये. मात्र तसं होणार नाही. त्यामुळे एकच कारवाई राहिली ती म्हणजे अटकेची. पुढील काही दिवसांमध्ये मला अटक होऊ शकते. मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला तरी मी घाबरणार नाही. मी दिल्ली समोर झुकणार नाही, मी मराठी माणूस आहे. मला अटक झाली तरी हा लढा तुम्ही पुढे सुरू ठेवा. सगळ्यांचा आवाज दाबला जाईल. आज शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस विरोधात उभे राहिलेत. ज्यांनी त्रास दिला त्यांना आम्ही सोडणार नाही. लोकशाहीची ताकद वापरू. त्याने तुम्ही सहज सत्तेत जाऊ शकता."


अनेकांना आत टाकलं : ईडीनं आजपर्यंत अनेकांवर कारवाई केली. संजय राऊत, अनिल देशमुख यांच्यासह अनेकांना जेलमध्ये टाकलं. त्यामुळं माझ्यावर पण तशीच कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळं माझं कुटुंब दडपणाखाली आहे. मात्र, आई वडिलांनी लहानपणापासून कोणापुढं झुकायचं नाही अशी शिकवण दिल्यानं मी घाबरणार नाही असा इशारा रोहित पवार यांनी दिलाय. तर निवडणूक आयोगाचे दोन सदस्य राजीनामा देऊन गेले आता लवकरच तिसरे सदस्यपण जातील अशी शक्यता आहे. न्यायमूर्ती निवडणूक लढवणार आहेत, काही जणांनी तर आधीपासून भाजपाच्या संपर्कात असल्याचं सांगितलं. त्यामुळं नेमकं चाललय काय असा प्रश्न उपस्थितीत होतो. भाजपाकडून मिळत असलेली वागणूक पाहता, आगामी काळात गेलेले लोक पुन्हा उद्धव ठाकरे आणि पवार साहेबांकडे परत येतील अशी शक्यता आहे, असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं.

हेही वाचा :

  1. ईडी हा भाजपाचा सहकारी पक्ष, शरद पवारांची मोदी सरकारवर खरमरीत टीका
  2. जागावाटपाचा अजित पवारांना बसणार पहिला धक्का...आमदार निलेश लंके शरद पवारांच्या पक्षात करणार प्रवेश?

ABOUT THE AUTHOR

...view details