महाराष्ट्र

maharashtra

सरकारी यंत्रणा म्हणजे भाजपाचे कार्यालय झाले; नकली शिवसेनेवरुन अंबादास दानवेंची पंतप्रधान मोदींवर टीका - Ambadas Danve On Pm Modi

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 12, 2024, 12:56 PM IST

Updated : Apr 12, 2024, 1:17 PM IST

Ambadas Danve On Pm Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उबाठा गटावर जोरदार हल्लाबोल करुन त्यांना नकली शिवसेना असा उल्लेख केला. त्यावर आता उबाठा गटाकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.

Ambadas Danve On Pm Modi
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

छत्रपती संभाजीनगर Ambadas Danve On Pm Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यावर विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलाय. "आम्ही खोटे आहोत तर तुमच्यासोबत असणारे कोण आहेत," असा प्रश्न अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. "तुम्ही केलेल्या घोषणांचं काय झालं. मोफत आरोग्य देणार असं म्हणता, मात्र तुमचं कार्ड चालत नाही आणि शिवसेनेवर टीका करतात, असा हल्लबोल त्यांनी केला. तुम्ही आम्हाला नकली म्हणतात, तुम्ही आमचे उंबरठे झिजवत होतात. तुमच्या हाताखाली राहणारी शिवसेना पाहिजे होती. मात्र आम्ही तसं झालो नाही," असं देखील त्यांनी सांगितलं.

सरकारी यंत्रणा भाजपाचे कार्यालय :"भाजपा सरकारी यंत्रणांचा ज्या पद्धतीनं वापर करत आहे, त्यानुसार हे सर्व कार्यालयं भाजपाचे प्रचार कार्यालय असल्यासारखं वाटत आहे. सध्या आचारसंहिता नसती, तर स्वतः आंदोलन करून पाट्या लागल्या असत्या," अशी टीका अंबादास दानवे यांनी केली. "शाहू महाराजांच्या गादीचा अवमान करण्याचं काम महाराष्ट्रात होत आहे. ते सहन होणार नाही. भाजपा विरोधकांना ग्रामपंचायत निवडणूक नाही, असं म्हणतात. मात्र तुम्हीच लक्षात ठेवा, अशी टीका त्यांनी केली. "तुमच्या जाहिरनाम्याचं काय होतं, त्याचं काय झाले, ते बाहेर आणणार," असं अंबादास दानवे यांनी सांगितलं.

भाजपानं राष्ट्रवादीला आधी सोबत घेतलं :"राजकारणात युती आघाडी होत असतात, आमच्यावर आरोप करतात. मात्र तुम्ही 2014 मध्येच राष्ट्रवादी पक्षाला सोबत घेतलं होतं. आता आम्ही सोबत गेलो तर टीका करू लागले. यांनी आधी ज्यांच्यावर टीका केली, तर लोक यांच्यासोबत जाऊन बसले. यांच्याकडं खजिना बळावर असलेले लोक आहेत. अजित पवार आणि देवेंद्र ठाकरे काय करतात, ते पाहावं. राज ठाकरे यांच्या भूमिका बाहेर येतील. नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांच्यासोबत व्यासपीठावर आले. तर इतर राज्यात त्याचे परिणाम भोगावे लागतील," अशी टीका देखील दानवे यांनी केली. "भाजपाचे नारायण राणे यांना विधानसभा निवडणुकीत पाडले आहे. नारायण राणे फक्त हिशोब घेण्याच्या कामाचे राहतील. अमोल कीर्तिकर ईडीला समोर जात आहेत, असं म्हणत महायुतीचे निवडणूक अर्ज करण्याची वेळ आली, तरी जागा वाटप ठरत नाहीये," असा हल्लाबोल दानवे यांनी केला.

हेही वाचा :

  1. तानाजी सावंतांवर रोहित पवारांनी केलेले आरोप खरे, लवकरच पुरावे सादर करणार - अंबादास दानवे - Ambulance Scam
  2. अंबादास दानवे अन् चंद्रकांत खैरे यांचं मनोमिलन! खैरेंना शुभेच्छा देत दानवेंची प्रचाराला सुरुवात करण्याची घोषणा - Sambhajinagar Lok Sabha Election
  3. मी भाजपामध्ये जाणार या बातम्यांना काही आधार नाही, ठाकरेंचे हात बळकट करणार -दानवे - Lok Sabha Election 2024
Last Updated : Apr 12, 2024, 1:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details