महाराष्ट्र

maharashtra

डॉ. आंबेडकर जयंतीच्या औचित्यावर बाबासाहेबांच्या सिग्नेचर एडिशन पेन विक्रीस उपलब्ध; लेखन संस्कृतीच्या प्रसाराला प्रेरणा देण्याचा उद्देश - Ambedkar Signature Edition Pen

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 12, 2024, 11:04 PM IST

Babasaheb Ambedkar Birth Anniversary : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्तानं बाबासाहेबांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुण्यातील ‘रायटिंग वंडर्स’ या संस्थेच्यावतीनं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सही असलेल्या विशेष पेनची निर्मिती करण्यात आली आहे. या सिग्नेचर एडिशनचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते आज (12 एप्रिल) पुण्यात एका कार्यक्रमात करण्यात आले.

Babasaheb Ambedkar Birth Anniversary
Babasaheb Ambedkar Birth Anniversary

अमूल्य पेनाच्या उद्‌घाटनाप्रसंगी सांगताना परशुराम वाडेकर

पुणेBabasaheb Ambedkar Birth Anniversary: येत्या 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असून जयंतीच्या निमित्ताने देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने पुण्यातील ‘रायटिंग वंडर्स’ या संस्थेच्यावतीनं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सही असलेल्या विशेष पेनची निर्मिती करण्यात आली आहे. या सिग्नेचर एडिशनचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते आज करण्यात आले.

पेनने स्वाक्षरी करून औपचारिक उद्‌घाटन :यावेळी रायटिंग वंडर्सचे सुरेंद्र करमचंदानी, डिक्कीचे अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव विजय खरे, एड. मंदार जोशी आणि प्रमोद करमचंदानी आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी या विशेष पेनने स्वाक्षरी करून या पेनचे औपचारिक अनावरण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या सिग्नेचर एडिशन पेनसाठी उच्च दर्जाच्या प्रिमिअम जर्मन रिफीलचा वापर केला आहे. दोन टोन मेटल बाॅडी असून डॉ. बाबासाहेबांची प्रतिमा आणि स्वाक्षरी या पेनवर कलात्मक पद्धतीनं कोरली आहे. हे पेन ४५० रुपयांत तर डायरी २८० रुपयांत उपलब्ध करण्यात आली आहे. डायरीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संक्षिप्त चरित्र आणि छायाचित्र आहे. हा विशेष पेन आणि डायरी एका सुंदर गिफ्ट सेटमध्ये देखील उपलब्ध करण्यात आला आहे.

लेखन संस्कृतीच्या प्रसारासाठी 'त्या' पेनचे विशेष महत्त्व :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मौलिक विचारांचा वारसा युवा पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि वाचनाप्रमाणेच लेखन संस्कृतीच्या प्रसारासाठीही डॉ. बाबासाहेबांच्या सिग्नेचर एडिशनच्या पेनचे विशेष महत्त्व आहे. नव्या शैक्षणिक धोरणातील विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी या उपक्रमातून प्रेरणा मिळेल. यावेळी परशुराम वाडेकर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मिलेल्या भारतीय संविधानाच्या निर्मितीचा अमृत महोत्सव नजिक आला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या सिग्नेचर एडिशन पेनची निर्मिती महत्त्वाची आहे. १४ एप्रिल रोजी बाबासाहेबांच्या जयंतीदिनी पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या सर्वांनी पुष्पहार, पुष्पगुच्छ यासोबत विद्यार्थ्यांसाठी वह्या आणाव्यात. गरजू विद्यार्थ्यांना या वह्यांचे तेथे वाटप करण्यात येईल. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षांत देशभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

हेही वाचा:

  1. निवडणुकीच्या तोंडावर आयाराम-गयारामांना ऊत, तिकिटासाठी कोणी कुठल्या पक्षात केला प्रवेश? - LOK SABHA ELECTION 2024
  2. श्रीरामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी साईबाबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्रभर खुलं राहणार - Sai Sansthan Shirdi
  3. भाजपा हा xxखाऊंचा पक्ष! अब की बार, भाजपा तडीपार; उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका - Uddhav Thackeray

ABOUT THE AUTHOR

...view details