महाराष्ट्र

maharashtra

क्रिकेट सामना जिंकण्यापूर्वीच मृत्यूनं हरवलं; अमरावतीजवळील अपघातात चार तरुण क्रिकेटर जागीच ठार

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 18, 2024, 11:44 AM IST

Updated : Feb 18, 2024, 11:59 AM IST

Cricketer Bus Accident Amravati : अमरावतीतील नांदगाव-खंडेश्वर महामार्गावर भीषण अपघात झालाय. सिमेंट कॉंक्रिट मिक्सर ट्रक आणि टेम्पो ट्रॅव्हलच्या धडकेत चार तरुणांचा जागीच मृत्यू झालाय. यात अपघातात दहा जण जखमी झालेत.

Amravati Accident News
अमरावती यवतमाळ मार्गावर भीषण अपघात

अमरावती Cricketer Bus Accident Amravati : अमरावती-यवतमाळ मार्गावर नांदगाव-खंडेश्वरलगत शिंगणापूर येथे सिमेंट मिक्सर ट्रकनं टेम्पो ट्रॅव्हलला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात अमरावती शहरातील चार तरुण जागीच ठार झालेत. तर दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. अमरावती शहरातील हे सर्व तरुण यवतमाळ येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी निघाले असताना ही घटना घडली.

यवतमाळला क्रिकेट स्पर्धेसाठी जात होते क्रिकेटपटू : या भीषण अपघातात श्रीहरी राऊत, आयुष बहाळे, सुयश अंबरते, संदेश पाडर या चार जणांचा मृत्यू झालाय. ते अमरावती शहरातील रहिवासी आहेत. रुक्मिणी नगर आणि रवी नगर येथील असणारे 15 तरुण क्रिकेटपटू हे यवतमाळ येथे आयोजित क्रिकेट सामन्यासाठी टेम्पो ट्रॅव्हल्सनं निघाले होते. सकाळी 9 वाजेच्या सुमारास नांदगाव खंडेश्वरपासून काही अंतरावर असणाऱ्या शिंगणापूर फाट्यालगत भरधाव वेगात असणाऱ्या सिमेंट काँक्रिट मिक्सर ट्रकनं टेम्पो ट्रॅव्हलला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, चार तरुण घटनास्थळीच ठार झालेत, तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींना रिंग्स रुग्णालयात केलं दाखल : सकाळी 9 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. त्यावेळी शिंगणापूर येथील ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले होते. नांदगाव खंडेश्वर पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले होते. अपघातातील जखमींना आधी नांदगाव खंडेश्वर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, अपघातातील जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळं त्यांना तत्काळ अमरावती शहरात उपचारासाठी हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानंतर सर्व जखमींना तत्काळ अमरावती शहरातील रिम्स रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच जखमींच्या नातेवाईकांनी रिम्स रुग्णालय परिसरात गर्दी केली. दरम्यान, नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोळंके यांनी या गंभीर घटनेचा तपास केला जात असल्याची माहिती दिली.

हेही वाचा -

  1. मंचरजवळ कार-टेम्पो-कंटेनरचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
  2. लेगापाणी घाटात कोसळली पिकअप ; चौघांचा जागीच मृत्यू तर दोघे गंभीर
  3. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अपघात; पुण्यातील दोन वकील जागीच ठार
Last Updated :Feb 18, 2024, 11:59 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details