महाराष्ट्र

maharashtra

नाशिक दिंडोरी-म्हसरुळ रोडवर भीषण अपघात; 5 ठार 3 जण गंभीर जखमी - Accident In Nashik

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 5, 2024, 7:21 PM IST

Road Accident Nashik : नाशिकच्या नाशिक-दिंडोरी मार्गावर आज (5 एप्रिल) बोलेरो गाडी आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील दोन आणि बोलेरो गाडीतील तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील तीन जण गंभीर जखमी आाहेत.

Road Accident Nashik
कार अपघात

कार अपघात स्थळाची पाहणी करताना पोलीस आणि नागरिक

नाशिकRoad Accident Nashik: नाशिकमध्ये अपघाताच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशात आज 5 एप्रिलला दुपारच्या सुमारास नाशिक-दिंडोरी मार्गावर बोलेरो गाडी आणि दुचाकीची जोरदार धडक झाली. यात दुचाकी वरील दोन आणि बोलेरो गाडीतील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत म्हसरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


अपघातात दोन्ही गाड्यांचा चक्काचूर :याबाबत मिळलेली माहिती अशी की, आज 5 एप्रिल दुपारच्या सुमारास नाशिक-दिंडोरी महामार्गवरील ढकांबे गावाजवळ बोलेरो कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. बोलेरो गाडीचे टायर फुटल्याने वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडीने दुचाकीला धडक दिली. यानंतर ही गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या बाभळीच्या झाडावर जाऊन आदळली. अपघात इतका भीषण होता की, दुचाकी आणि बोलेरो गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. घटनेची माहिती मिळताच दिंडोरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने तीन गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.

'ही' आहेत मृतांची नावे :या अपघातात दुचाकीवरील अनिल शिवाजी बोडके आणि त्यांचा मुलगा राहुल बोडके यांचा जागीच मृत्यू झाला तर बोलेरो गाडीतील मुकेश यादव आणि राजेंद्र कुमार यादव (राहणार वाराणसी, उत्तरप्रदेश) यांचा मृत्यू झाला. यातील एका मृताचे नाव तर तीन जखमींचे नाव अद्याप समजू शकले नाही. उन्हाळ्याचे दिवस असल्यानं टायरमध्ये हवा योग्य प्रमाणात ठेवणं गरजेचं आहे. जर हवा योग्य प्रमाणात नसेल तर तापलेल्या रस्त्यावर असे टायर फुटून अपघात होण्याची शक्यता असते. तसंच प्रत्येकानं टायरची तपासणी करुन ते झिजले असतील तर बदलण्याची गरज पोलिसांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा :

  1. कोस्टल रोडवरून जाताना वेगावर ठेवा नियंत्रण, पहिल्या अपघातात सुदैवानं वाचला चालक - coastal road first accident
  2. घराच्या ओढीनं जाताना ट्रॅक्टर बिघडला; ट्रकच्या धडकेत चार ऊसतोड मजूर ठार, 10 गंभीर जखमी - Sangli accident
  3. जम्मू-कश्मीरच्या रामबन दरीत वाहन कोसळल्यानं 10 जणांचा जागीच मृत्यू, पंतप्रधानांकडून 2 लाखांची मदत जाहीर - JAMMU AND KASHMIR ACCIDENT

ABOUT THE AUTHOR

...view details