महाराष्ट्र

maharashtra

दिल्ली सीमा बंद! आंदोलक शेतकऱ्यांवर अश्रुधुरांचा मारा; शेतकरी आंदोलनावर ठाम

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 14, 2024, 8:35 AM IST

Updated : Feb 14, 2024, 9:24 AM IST

Farmer Protest : शेतकरी संघटनांच्या 'चलो दिल्ली' मोर्चाबाबत हरियाणा आणि दिल्लीतील पोलीस हाय अलर्ट मोडवर आहेत. शेतकरी ट्रॅक्टर आणि ट्रॉली घेऊन दिल्लीकडं निघालेत. मात्र, दिल्ली पोलिसांनी ठिकठिकाणी बॉर्डर सील केल्या असून शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून अडवलं आहे. शंभू सीमेवर शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली असून पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या आहेत. यामध्ये काही शेतकरी जखमी झाले आहेत.

Farmer Protest
शेतकऱ्यांवर अश्रू धुरांच्या नळकांड्या फोडल्या

नवी दिल्लीFarmer Protest : शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकारुन दिल्लीकडं कूच करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं पोलीस प्रशासनानं दिल्लीला लागून असलेल्या सर्व सीमा सील केल्या आहेत. दिल्ली ते हरियाणाचा रस्ता सील करण्यात आला आहे. त्याचबरोबर हरियाणातून दिल्लीकडं येणारा रस्ताही सील करण्यात आला आहे. मात्र शेतकरी संघटना आपल्या आंदोलनावर ठाम आहेत.

शेतकरी आंदोलन

1) दिल्लीत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. सिंघू, टिकरी, गाझीपूर आणि शंभू या सीमांना पूर्णपणे छावण्यांचं स्वरूप आलं आहे.

अश्रू धुरांच्या नळकांड्यांचा मारा

2) दिल्ली मेट्रोच्या अनेक स्थानकांवर गेट बंद करण्यात आले आहेत.

शेतकरी आंदोलन

3) दिल्ली, नोएडा आणि गुरुग्राममध्ये अनेक ठिकाणी लांबच लांब ट्रॅफिक जाम असून सर्वसामान्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतय.

शेतकरी आंदोलन

4) एमएसपी (MSP) हमीभावासह अनेक मागण्यांवर शेतकरी ठाम आहेत. "आम्ही नाही तर सरकारनं रस्ता अडवला आहे," असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

सीमेवर बॅरीकेट्स

5) "आम्हाला संघर्ष नको, आम्ही शांततापूर्ण आंदोलनाच्या बाजूनं आहोत. केंद्र सरकार आमच्या मागण्यांबाबत अजिबात गंभीर नाही," असंही शेतकरी नेते सांगत आहेत.

आंदोलकांवर पाण्याचा मारा

6) "आम्ही शेतकरी धान्य पिकवतो आणि सरकार खिळे ठोकण्याचं काम करत आहे. आम्ही लाठ्या आणि अगदी गोळ्यांचा सामना करण्यास तयार आहोत. सरकार फक्त दावा करतं की, त्यांना शेतकऱ्यांची काळजी आहे, पण तसं अजिबात नाही," अशी खंतही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

शेतकरी आंदोलन

7) दिल्ली-एनसीआर सीमेवर सुमारे 18 हजार जवान तैनात करण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांसह रॅपिड ॲक्शन फोर्स, सीआयएसएफ, बीएसएफचे जवानही तैनात करण्यात आले आहेत.

दिल्ली सीमा सील

8) शेतकऱ्यांचा विरोध पाहता दिल्ली सरकारनं बवाना स्टेडियमचे जेलमध्ये रुपांतर करण्याचा केंद्राचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.

दिल्लीतील सीमेवर शेतकऱ्यांना अडवण्यासाठी असे खिळे ठोकण्यात आलेत

9) सुरक्षा दलाचे जवान ड्रोनच्या माध्यमातूनही नजर ठेवत आहेत. सीमेवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवूनही परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.

नाष्टा करताना पोलीस दल

10) काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या? : एमएसपीसाठी (MSP) कायदेशीर हमी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, शेतकरी कर्जमाफी, शेतकऱ्यांवरील गुन्हे मागं घेणं, लखीमपूर खेरी हिंसाचारातील पीडितांना न्याय, या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. त्यामुळे हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशातील अनेक शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

हेही वाचा :

1'अन्नदाता' पुन्हा रस्त्यावर; सरकार बरोबरची चर्चा निष्फळ, नाकाबंदी करत प्रशासनानं ठोकले रस्त्यावर खिळे

2आरोप करायचे अन् पक्षात प्रवेश द्यायचा, ही भाजपाची स्टाईल; चव्हाणांच्या भाजपा प्रवेशावर सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

3कतारमध्ये अडकलेल्या माजी अधिकाऱ्यांना शाहरुख खाननं सोडवलं? किंग खानच्या टीमनं केला खुलासा

Last Updated : Feb 14, 2024, 9:24 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details