महाराष्ट्र

maharashtra

सीबीआयनंतर समीर वानखेडे यांच्यावर ईडीची कारवाई, मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 10, 2024, 10:48 AM IST

Sameer Wankhede : मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीनं समीर वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर अभिनेता शाहरुख खानकडून 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

Sameer Wankhede
Sameer Wankhede

मुंबई Sameer Wankhede : सीबीआयनंतर आता ईडीनं देखील मुंबई एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. एनसीबीनं समीर वानखेडे आणि इतर दोन अधिकाऱ्यांविरोधात केलेल्या तपासात उघड झालं आहे की त्यांनी कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणात आर्यन खानच्या सुटकेसाठी अभिनेता शाहरुख खानकडून खंडणी मागितली होती. सूत्रांनुसार, ईडी लवकरच समीर वानखेडे, तत्कालीन अधीक्षक व्हीव्ही सिंग आणि गुप्तचर अधिकारी आशिष रंजन प्रसाद यांना समन्स बजावणार आहे.

समीर वानखेडेंवरील आरोप काय : समीर वानखेडेवर ऑक्टोबर 2021 च्या क्रूझ ड्रग्ज प्रकरणात मुलगा आर्यन खानला अडकण्यापासून वाचवण्यासाठी शाहरुख खानकडून 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. याशिवाय त्यांच्या विरोधात ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा जास्त संपत्ती मिळवल्याचा गुन्हाही प्रलंबित आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीनं एनसीबीच्या काही अधिकाऱ्यांना समन्स बजावल्यानंतर समीर वानखेडे यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. ईडी ईएसआयआर रद्द करून कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यात येऊ नये, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे.

सर्व आरोप फेटाळले : सीबीआयनं गेल्या वर्षी मे महिन्यात दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे, ईडीनं काही दिवसांपूर्वी समीर वानखेडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मात्र त्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले असून सीबीआयची ही कारवाई काही एनसीबी अधिकाऱ्यांनी केलेल्या सूडबुद्धीचा परिणाम असल्याचं म्हटलं आहे. आर्यन खानला 3 ऑक्टोबर 2021 रोजी मुंबईतील कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकल्यानंतर अटक करण्यात आली होती.

हे वाचलंत का :

  1. Sameer Wankhede Met Sanjay Raut: समीर वानखेडेंनी घेतली संजय राऊतांची भेट, भेटीचं कारण माहितेय का?
  2. Cordelia Cruise Drugs Case : कार्डेलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणाचा तपास एनसीबी उपमहासंचालक करू शकत नाही; समीर वानखेडेंचा प्रतिज्ञापत्रात दावा
  3. Sameer Wankhede Death Threat : समीर वानखेडे यांना बांगलादेशमधून जीवे मारण्याची धमकी, गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल केली तक्रार

ABOUT THE AUTHOR

...view details