महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मूर्खांना उत्तर देत नाही; 'त्या' फोटोवरुन देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना टोला

Devendra Fadnavis : अयोध्येतील राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना 22 जानेवारी रोजी होणार आहे. अयोध्येतील राम मंदिरात भगवान श्रीराम विराजमान करण्याचं कारसेवकांचं स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक फोटो 'एक्स'वर पोस्ट केला आहे. हा फोटो नागपूर रेल्वे स्थानकाचा असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं आहे.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 21, 2024, 4:21 PM IST

देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

नागपूर Devendra Fadnavis : नागपूरहून अयोध्येला जाताना फडणवीस यांनी स्वतःचा फोटो 'एक्स'वर पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करून देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत कारसेवेला गेल्याचा थेट पुरावा दिला आहे. या फोटोवर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मी' मूर्ख लोकांना उत्तर देत नाही, अशा शब्दात राऊतांवर टीकास्त्र सोडलंय. 'मी' माझ्या आनंदासाठी कारसेवेचा फोटो पोस्ट केला आहे, असं फडणवीस यांनी म्हटलंय. ते रविवारी नागपुरात बोलत होते.

त्यावेळची परिस्थिती पुन्हा आठवली : नागपुरातून प्रकाशित होणाऱ्या एका वृत्तपत्रानं मला कारसेवेला जात असतानाचा फोटो पाठवला. मी कारसेवेला जात असताना, छायाचित्रकारानं माझा फोटो काढला होता. त्यांनी आज तो मला पाठवला, म्हणून मी त्याचे आभार मानण्यासाठी तो फोटो पोस्ट केला. मला त्यावेळची परिस्थिती पुन्हा आठवली. त्या आनंदात मी तो फोटो पोस्ट केला. त्यामुळं मी पोस्ट केलेला फोटो कोणालाच उत्तर देण्यासाठी नाही, असे मला वाटतं. मी उत्तर देण्याच्या फंदात पडत नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

रामाचं अस्तित्व नाकारलं त्यांना मी उत्तर देत नाही : ज्या लोकांनी रामाचं अस्तित्व नाकारलं, त्या लोकांना मी उत्तर देत नाही. ज्या लोकांनी राम खरंच 'त्या' ठिकाणी जन्माला आले का? अशा प्रकारचा प्रश्न विचारला. जे रामालाच मानायला तयार नाहीत, मी त्यांना कशाला उत्तर देऊ. मी पुन्हा एकदा सांगतो, 'मी' मूर्खांना उत्तर देत नाही. 'मी' माझ्या आनंदासाठी हा फोटो शेयर केला आहे, असं फडणवीसांनी सांगितलं.


हे वाचलंत का :

  1. देवेंद्र फडणवीसांनी राऊतांच्या आव्हानानंतर सोशल मीडियात शेअर केला फोटो, काय केला दावा?
  2. राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी 'हे' सेलिब्रिटी झाले रवाना
  3. 'विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकेतील मुद्द्यांवर विश्वास ठेवणं कठीण'; सुटीविरोधातील याचिकेवरुन उच्च न्यायालय संतापलं

ABOUT THE AUTHOR

...view details