महाराष्ट्र

maharashtra

नांदेडमध्ये काँग्रेसला धक्का : अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात 55 माजी नगरसेवकांचा भाजपामध्ये प्रवेश

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 24, 2024, 5:44 PM IST

Updated : Feb 24, 2024, 6:49 PM IST

55 Ex Corporator Join Bjp : वाघाळा महानगर पालिकेच्या 55 निर्वाचित आणि स्विकृत माजी नगरसेवकांनी अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसला नांदेडमध्ये मोठा धक्का बसला आहे.

अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात 55 माजी नगरसेवक भाजपात
अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात 55 माजी नगरसेवक भाजपात

अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात 55 माजी नगरसेवक भाजपात

नांदेड55 Ex Corporator Join Bjp :राज्यसभाखासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत वाघाळाच्या जवळपास 55 माजी नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला आहे. चव्हाण यांच्या उपस्थितीत आज शनिवार (दि. 24 फेब्रुवारी) रोजी नांदेड येथे माजी नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकित नांदेडच्या 50-55 नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला आहे. स्वतः अशोक चव्हाण यांनीच आज दुपारी समाज माध्यमांवर फोटो टाकला आहे.

भाजपाला समर्थन देत असल्याचं जाहीर केलं : विधान परिषदेचे माजी गटनेते अमरनाथ राजूरकर यांनी याविषयी बोलताना सांगितलं की, "अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर नांदेड-वाघाळा महानगर पालिकेच्या 52 माजी नगरसेवकांनी त्यांच्याशी संपर्क साधून पाठिंबा दिला होता. चव्हाण यांचं नांदेडला आगमन झाल्यानंतर कालपासून अनेक नगरसेवकांनी निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. तर, काही नगरसेवकांनी आज झालेल्या एका बैठकीत भाजपला समर्थन देत असल्याचं जाहीर केलं. अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला."

काँग्रेसचे 81 पैकी 73 नगरसेवक निवडून आले होते : "पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आतापर्यंत निवडून आलेले आणि स्विकृत मिळून एकूण 55 नगरसेवक भाजपामध्ये सामिल झाले आहेत. नांदेड-वाघाळा महानगर पालिकेच्या मागील निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे 81 पैकी 73 नगरसेवक निवडून आले होते. पुढील काळात त्यातील आणखी काही नगरसेवक भाजपामध्ये प्रवेश करतील," असंही सूतोवाच अमरनाथ राजूरकर यांनी केलं आहे.

विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी : अशोक चव्हाण यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करुन भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांचे स्वागत आणि अभिनंदन केलं. नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या मागील कार्यकाळातील नगरसेवकांशी आज चर्चा झाली. सुमारे 55 पेक्षा अधिक माजी निर्वाचित नगरसेवक आणि स्वीकृत सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा निर्णय घेतला, असं चव्हाण यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

Last Updated : Feb 24, 2024, 6:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details