महाराष्ट्र

maharashtra

अहमदनगरमध्ये खळबळ; हळदीच्या कार्यक्रमात दोनशेहून अधिक लोकांना विषबाधा

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 29, 2024, 10:12 AM IST

Ahmednagar Food Poisoning : हळदीच्या कार्यक्रमातील जेवणातून तब्बल 200 दोनशेहून अधिक लोकांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात बुधवारी (ता. २८) रात्री घडली.

Food Poisoning
हळदीच्या कार्यक्रमात विषबाधा

माहिती देताना डॉ दिघे

अहमदनगर Ahmednagar Food Poisoning :जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील करवंदरा गावात हळदीच्या कार्यक्रमाच्या (Haldi Program) जेवणातून दोनशेहून अधिक लोकांना विषबाधा झालीय. या प्रकरणानंतर तालुक्यात खळबळ उडाली आहे. बुधवारी रात्री अनेकांना जुलाब आणि उलटीचा त्रास जाणवल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विषबाधा झालेल्या व्यक्तींमध्ये सात बालकांचा समावेश आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आजी-माजी आमदारांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीनं घटनास्थळी भेट देऊन रुग्णांना मदत करण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.


हळदीच्या कार्यक्रमात विषबाधा : अकोले तालुक्यातील मवेशी करवंदरा गावातील सोमा दगडू भांगरे यांचा मुलगा सखाराम याचा विवाह, पाडोशी येथील रामभाऊ साबळे यांच्या मुलीशी निश्चित झाला होता. मात्र नवरदेवाकडं हळदीचा कार्यक्रम बुधवारी रात्री असल्यानं दोनशे नातेवाईक जेवणासाठी आले होते. मात्र रात्री जेवल्यानंतर काही वऱ्हाडी यांना रस्त्यातच उलट्या, जुलाब होऊ लागल्यामुळं त्यांना तातडीनं संगमनेर, नाशिक, राजुर रुग्णालय, कोहणे, खिरविरे रुग्णालयात हलवण्यात आलं. विषबाधा झालेल्या रुग्णांत महिला आणि मुलांचाही समावेश आहे. आता सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलंय जातय.

लग्नातील जेवणातून अनेकांना विषबाधा : या आधीही शिर्डी येथे आशीच एक घटना घडली होती. लग्नातील जेवणातून अनेकांना विषबाधा झाल्याची घटना शिर्डीत घडली होती. साई पालखी निवारा येथे पाच नोव्हेंबर रोजी एक लग्न होतं. दुपारी लग्न लागल्यानंतर पाहुण्यांना जेवण वाढण्यात आलं होतं. जेवणानंतर वऱ्हाडी मंडळींना मळमळ, उलट्या तसंच जुलाबाचा त्रास सुरू झाला होता. त्यानंतर वऱ्हाडी मंडळींना तातडीनं साई संस्थानच्या साईनाथ आणि साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.


हेही वाचा -

  1. भागवत सप्ताहामध्ये 300 हून अधिक भाविकांना भगरीतून विषबाधा; लोणार तालुक्यातील घटना
  2. Shirdi Food Poisoning : लग्नातील जेवणातून वऱहाड्यांना विषबाधा; शिर्डीतील घटना
  3. Mid Day Meal : मुंबई महापालिकेच्या मध्यान्ह भोजनामुळे विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास; १६ विद्यार्थी रुग्णालयात दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details