महाराष्ट्र

maharashtra

सानियानंच शोएब मलिकपासून विभक्त होण्याची इच्छा व्यक्त केली? घटस्फोटाचं नेमकं कारण काय?

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 21, 2024, 5:57 PM IST

Sania Mirza Divorce : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकच्या घटस्फोटानंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. आता या दोघांच्या घटस्फोटामागचं कारण समोर आलंय.

sania mirza shoaib malik
sania mirza shoaib malik

मुंबई Sania Mirza Divorce : पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकनं शनिवारी (20 जानेवारी) पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबतच्या लग्नाचे फोटो शेअर करताच दोन्ही देशातील क्रीडा चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. शोएबच्या या पोस्टनंतर भारतीय स्टार टेनिसपटू सानिया मिर्झासोबत त्याचं लग्न मोडल्याच्या अफवांवर शिक्कामोर्तब झालं. या दोघांच्या घटस्फोटाचं कारण शोएब मलिकचे विवाहबाह्य संबंध असल्याचं सांगण्यात येत आहे.

घटस्फोट का झाला : पाकिस्तान डेली या पाकिस्तानी मीडिया आउटलेटच्या वृत्तानुसार, शोएब मलिक आणि सना जावेदच्या लग्नाला शोएबच्या कुटुंबातील कोणीही उपस्थित नव्हतं. शोएबच्या बहिणी देखील त्यानं तिसऱ्यांदा लग्न केल्याबद्दल नाखूष होत्या. या अहवालात दावा केला आहे की, शोएबच्या बहिणींनी सानिया मिर्झाशी घटस्फोट घेण्यावर चिंता व्यक्त केली होती. शिवाय सानिया, शोएब मलिकच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळली होती.

कुटुंबानं पुष्टी केली : आज, 21 जानेवारीला सानिया मिर्झाची बहीण अनम मिर्झानं तिच्या इंस्टाग्रामवर एक अधिकृत विधान पोस्ट केलं. यात तिनं सानिया मिर्झा आणि तिच्या कुटुंबाच्या वतीनं घटस्फोटाची पुष्टी केली. "सानियानं तिचं वैयक्तिक आयुष्य नेहमीच लोकांच्या नजरेपासून दूर ठेवलं. शोएब आणि तिचा घटस्फोट होऊन आता काही महिने झाले आहेत. शोएबला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!", असं या निवेदनात म्हटलंय.

'खुला'द्वारे घटस्फोट : शोएब मलिक आणि सना जावेद यांच्या लग्नाची बातमी इंटरनेटवर पसरल्यानंतर काही तासांनी, सानिया मिर्झाच्या वडिलांनी 'खुला'द्वारे घटस्फोट घेतल्याची पुष्टी केली होती. सूत्रांनुसार, सानिया मिर्झानंच शोएब मलिकपासून विभक्त होण्याची इच्छा व्यक्त केली होती.

दोघांना एक मुलगा : सानिया मिर्झा आणि शोएब मलिक 2010 मध्ये हैदराबादमध्ये पारंपारिक पद्धतीनं लग्नाच्या बंधनात अडकले होते. 2018 मध्ये त्यांना इझान मिर्झा मलिक नावाचा मुलगा झाला. 2022 मध्ये त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण झाल्याच्या बातम्या येणं सुरू झालं. अलीकडेच, त्यांनी त्यांच्या वैयक्तिक सोशल मीडिया अकाउंटवरून एकमेकांचे फोटो काढून टाकले होते.

हे वाचलंत का :

  1. सानिया मिर्झाच्या चाहत्यांकडून शोएब मलिक ट्रोल, तिसरं लग्न केल्यानं सुनावलं!
  2. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्यात झालेला 'खुला' काय आहे?

ABOUT THE AUTHOR

...view details