महाराष्ट्र

maharashtra

'बुटका डोंगराच्या माथ्यावर उभा राहिला तरी बुटका असतो, मात्र...'; मुंबईच्या कर्णधारपदाबाबत काय म्हणाले नवज्योत सिंग सिद्धू? - Navjot Sidhu on Rohit Sharma

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 25, 2024, 2:52 PM IST

Navjot Sidhu on Rohit Sharma : आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सनं हार्दिकच्या नेतृत्वाखाली पहिला सामना खेळला. या सामन्यात चाहत्यांच्या नजरा भारतीय कर्णधार रोहित शर्मावर खिळल्या होत्या. यावरुन सिद्धू काय म्हणाले जाणून घ्या.

'बुटका डोंगराच्या माथ्यावर उभा राहिला तरी बुटका असतो, मात्र...'; मुंबईच्या कर्णधारपदाबाबत काय म्हणाले नवज्योत सिंग सिद्धू?
'बुटका डोंगराच्या माथ्यावर उभा राहिला तरी बुटका असतो, मात्र...'; मुंबईच्या कर्णधारपदाबाबत काय म्हणाले नवज्योत सिंग सिद्धू?

अहमदाबाद Navjot Sidhu on Rohit Sharma : यंदाच्या आयपीएलमधील पाचवा सामना रविवारी गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. गुजरातनं हा सामना 6 धावांनी जिंकला. मात्र या सामन्यात सर्वांच्या नजरा रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्यावर होत्या. ज्यात रोहित शर्मा कर्णधार म्हणून नाही तर एक खेळाडू म्हणून खेळत होता तर हार्दिक पांड्या कर्णधार म्हणून खेळत होता. हार्दिकच्या कर्णधारपदासोबतच या सामन्यातील रोहितच्या कामगिरीवरही चाहत्यांची नजर होती.

भारतीय संघात पाच कर्णधार एकत्र खेळायचे :रोहितचे कर्णधारपद गेल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रकारच्या गोष्टी बोलल्या जात आहेत. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला मुंबईच्या कर्णधारपदावरुन हटवल्यानं मुंबईच्या संघ व्यवस्थापनावर सातत्यानं टीका होत आहे. यावर आता समालोचक नवज्योत सिंग सिद्धूंनी एक मोठी गोष्ट सांगितलीय. ते म्हणाले, "आज रोहित शर्मा एक खेळाडू म्हणून खेळत आहे, ही पहिली वेळ नाही. मी अशा भारतीय संघात खेळलो आहे, जिथं पाच कर्णधार एकत्र खेळायचे. वेंगसरकर, गावस्कर, कपिल देव, श्रीकांत, रवी शास्त्री हे सगळे कर्णधार एकाच संघात खेळायचे."

देव शेवटी देव असतो : सिद्धू पुढे म्हणाले की, 'मी हमी देतो की यामुळं रोहित शर्मा लहान होणार नाही, तो एक मोठा खेळाडू आहे. ही एक फ्रँचायझी आहे ज्यानं एक नवीन माणूस आणला आहे, जो चांगला आहे आणि सर्वांनी त्याला स्वीकारलं आहे. परंतु, रोहित एक उत्कृष्ट खेळाडू आहे." पुढं त्यांनी आपल्या काव्यात्मक शैलीत सांगितलं की, 'बुटका डोंगराच्या माथ्यावर उभा राहिला तरी बुटका असतो, मात्र देव विहिरीच्या खोलात जरी उभा राहिला तरी तो देव असतो.'

सूर्याला पुरावा देण्याची गरज नाही : सिद्धू पुढं म्हणाले की, लोखंड तापते, 'धुमसते आणि नंतर त्याची तलवार बनते. लाखो वादळांचा सामना केल्यानंतर कोणीतरी रोहित आणि धोनीसारखा कर्णधार बनतो. त्यांना कोणताही पुरावा देण्याची गरज नाही. सूर्य काही पुरावा देतो का? त्याचं तेज हाच त्याचा पुरावा आहे. इतका वेळ सातत्यानं धावा करणं हा त्यांचा पुरावा आहे.'

हेही वाचा :

  1. मुंबईची परंपरा कायम! कर्णधार बदलूनही सलग 12व्यांदा हंगामातील पहिल्या सामन्यात पराभव - IPL 2024 GT vs MI
  2. IPL 2024 : राजस्थान रॉयल्सनं लखनौ सुपर जायंट्सला चारली धूळ, कर्णधार संजू सॅमसनची नाबाद 82 धावांची खेळी - RR vs LSG Live Score

ABOUT THE AUTHOR

...view details