महाराष्ट्र

maharashtra

Hardik Pandya : रोहित शर्माचं संघात कोणतं स्थान? हार्दिक पंड्यानं थेटच सांगितलं....

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 18, 2024, 7:33 PM IST

Hardik Pandya : मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाल्यानंतर हार्दिक पंड्या आणि मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी सोमवारी मुंबईत एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी दोघांनीही विविध मुद्द्यांवर संवाद साधला. तसंच रोहित शर्मासंदर्भातही हार्दिकनं यावेळी भाष्य केलं.

Hardik Pandya
Hardik Pandya

मुंबई Hardik Pandya : येत्या 22 मार्चपासून 'आयपीएल'ला (IPL 2024) सुरुवात होत आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या या हंगामासाठी आम्ही सर्वजण तयार आहोत. तसंच या 'आयपीएल'मध्ये माझं लक्ष हे चांगली गोलंदाजी करण्यावर असेन, असं हार्दिक पंड्या यावेळी म्हणाला. तसंच मी पूर्णपणे फिट असल्याचंही पंड्यानं यावेळी दाखवून दिलं.

'आयपीएल'साठी हार्दिक फिट : २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान हार्दिक पंड्याला दुखापत झाली होती, तेव्हापासून तो क्रिकेटमधून बाहेर पडला होता. दुखापतीतून सावरल्यानंतर हार्दिक पंड्यानं पहिल्यांदाच 'डीवाय पाटील टी 20' स्पर्धा खेळली आणि आपण 'आयपीएल'साठी फिट असल्यांच त्यानं दाखवून दिलं.

MI मध्ये येणं चांगली भावना : रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून हार्दिक पंड्याची नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्तीवरुन रोहित शर्माच्या चाहत्यांमध्ये प्रचंड निराशा पसरली होती. यावरुन अनेक मिम्सही सोशल मीडियावर शेयर करण्यात आले होते. त्यामुळं मुंबई इंडियन्स, हार्दिक पंड्या चांगलेच ट्रोल झाले होते. मुंबई इंडियन्समध्ये परत येणं ही एक वास्तविक भावना आहे, असं हार्दिक पंड्यानं म्हटलंय.

रोहित शर्माची मदत होईल : रोहित शर्माकडून मुंबई इंडियन्सचं कर्णधार पद काढून घेल्यानंतर बरीच चर्चा झाली होती. यावर हार्दिक पंड्यानं सकारात्मक उत्तर दिलंय. रोहित हा अनेकवर्ष कर्णधार होता. त्याच्या या अनुभवाचा मला आणि संघाला नक्की फायदा होणार आहे. याचा परिणाम रोहितच्या खेळावर होणार नसून, खेळाची रोहितची जी जागा आहे त्यावरच तो कायम राहणार आहे, असं हार्दिक पंड्या म्हणाला. रोहितबरोबर चर्चा झाली का? यावर पंड्यानं 'होपण आणि नाहीपण' असं उत्तर दिलं. तसंच एकदा का रोहित खेळायला बरोबर आला की गप्पा मारू, असं पंड्या म्हणाला.

दरम्यान, मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर म्हणाले की, संघ व्यवस्थापन फलंदाज सूर्यकुमार यादवच्या अपडेटची वाट पाहत आहे.

हेही वाचा -

  1. WPL 2024 Final: आरसीबीला 16 वर्षांच्या 'विराट' अपयशानंतर अखेर डब्ल्यूपीएलमधून मिळाली विजेते पदाची 'स्मृती'
  2. IPL 2024 : IPL आधी BCCI ची मोठी घोषणा! ऋषभ पंत इन, तर दोन दिग्गज खेळाडू दुखापतीमुळं आऊट
  3. IPL 2024 चे 7 एप्रिलपर्यंतचं वेळापत्रक जाहीर, पहिला सामना कोणत्या संघांमध्ये खेळला जाणार?

ABOUT THE AUTHOR

...view details