महाराष्ट्र

maharashtra

व्हॉलीबॉल खेळाडूवर बलात्कार केल्याप्रकरणी हॉकीपटू वरुण कुमारवर गुन्हा

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 6, 2024, 7:23 PM IST

POCSO Against Varun Kumar : हॉकीपटू वरुण कुमारवर एका महिला खेळाडूनं गंभीर आरोप केला आहे. वरुणवर 5 वर्षांपासून लैंगिक शोषणाचा आरोप करत पीडितेनं बेंगळुरूमध्ये एफआयआर दाखल केला आहे. त्यामुळं वरूण कुमारवर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

hockey player Varun Kumar
hockey player Varun Kumar

बेंगळुरू/शिमलाPOCSO Against Varun Kumar:भारतीय हॉकी संघाचा खेळाडू वरुण कुमारवर हैदराबादच्या व्हॉलीबॉलपटूनं लग्नाच्या नावाखाली लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून बेंगळुरू पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. वरुण कुमार हिमाचल प्रदेशातील चंबा येथील असून सध्या त्याचं कुटुंब पंजाबमधील जालंधरमध्ये वास्तव्यास आहे. सध्या बेंगळुरू पोलीस वरुणचा शोध घेत आहेत.

वरुण कुमारवर गंभीर आरोप :पीडितेच्या म्हणण्यानुसार, ती सोशल मीडियाच्या माध्यमातून वरुणला भेटली होती. त्यानंतर वरुणनं तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यावेळी पीडितेचं वय 17 वर्षे होतं. वरुणनं तिच्याशी लग्न करण्याचं वचन दिलं होतं. पीडितेच्या म्हणण्यानुसार, 2019 मध्ये वरुणनं तिला जेवणाच्या बहाण्यानं बेंगळुरूमधील जयनगरमध्ये नेऊन तिच्याशी जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवलं होते. त्यानं 5 वर्षांत तिच्यासोबत अनेकवेळा शारीरिक संबंध ठेवल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे.

POCSO अंतर्गत गुन्हा दाखल :पीडितेनं वरुणवर 5 वर्षांत अनेकवेळा लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळं पीडितेच्या तक्रारीवरून, बेंगळुरूमधील ज्ञानभारती पोलीस स्टेशनमध्ये पॉक्सो कायदा, बलात्कार, फसवणुकीच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

एक वर्षापूर्वी माझे वडील वारले, तेव्हा तो शेवटच्या वेळी आमच्या घरी आला. त्यानंतर त्यानं माझ्याशी कधीही संपर्क साधला नाही. - पीडित

वरुण कुमारच्या नावावर अनेक पुरस्कार : वरुण कुमार हा मूळचा हिमाचलच्या चंबा जिल्ह्यातील डलहौसीचा आहे. परंतु हॉकीमधील कारकीर्द पाहता, त्याचं कुटुंब पंजाबमधील जालंधर येथे स्थलांतरित झालंय. शालेय, राज्य आणि कनिष्ठ स्तरावरील उत्कृष्ट कामगिरीनंतर वरुणला 2019 मध्ये भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. वरुण कुमार सध्या भारतीय हॉकी संघाचा बचावपटू आहे. 2022 च्या बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्य, 2022 च्या आशियाई गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या संघाचा तो भाग होता. याआधी तो 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या संघातही होता. वरुणकडं आशियाई खेळ 2022 चे सुवर्ण पदक आणि आशियाई खेळ 2018 चे कांस्य पदक देखील आहे. याशिवाय आशिया कप, चॅम्पियन्स ट्रॉफी, आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी, कॉमनवेल्थ गेम्स, ज्युनियर वर्ल्ड कप, ज्युनियर आशिया कपही वरुण कुमारच्या नावावर आहे.

अर्जुन पुरस्कारासह एक कोटीचं बक्षीस : टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारा भारतीय हॉकी संघाचा खेळाडू वरुण कुमार याला 2021 साली अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना अर्जुन पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. 2021 मध्येच हिमाचल सरकारनं टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये पदक जिंकून परतलेल्या वरुण कुमारला 1 कोटी रुपयांच्या बक्षीसासह डीएसपीची नोकरी देऊ केली होती. दोनच दिवसांपूर्वी, 4 फेब्रुवारी 2024 रोजी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी वरुणला डीएसपीचं नियुक्ती पत्र दिलंय. आता त्याच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानं त्याची कारकीर्दच धोक्यात येण्याची शक्यता आहे.

हे वाचलंत का :

  1. लोकसभा निवडणूक 2024 : मुंबईतील सर्व जागा जिंकणार, भाजपाचा निर्धार
  2. फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; 7 जणांचा मृत्यू, 42 हून अधिक गंभीर जखमी
  3. गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुलं, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

ABOUT THE AUTHOR

...view details