महाराष्ट्र

maharashtra

पिंपरी चिंचवड येथे भव्य चित्रकला स्पर्धेचं आयोजन; हजारो मुलांनी चित्रकलेतून साकारले प्रभू श्रीराम

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 20, 2024, 10:59 PM IST

Painting Competition : नॉवेल इंटरनॅशनल स्कूल येथे विश्व हिंदू परिषद पिंपरी चिंचवड आणि कलारंग सांस्कृतिक कलासंस्था यांच्या संयुक्त विद्यमानं अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या आगमना निमित्त भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

Painting Competition
चित्रकला स्पर्धेचे आयोजन

कलारंग व विश्व हिंदू परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन

पिंपरी चिंचवड Painting Competition : देशभरात श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठाची धूम दिसत आहे. आज नॉवेल इंटरनॅशनल स्कूल येथे विश्व हिंदू परिषद पिंपरी चिंचवड आणि कलारंग सांस्कृतिक कलासंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने, अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या आगमना निमित्त भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील जवळपास ३२ शाळांमधील इयत्ता सहावी ते बारावी मधील 1227 विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.

स्पर्धेमध्ये होते हे विषय :1) श्रीराम आणि शबरी भेट 2) श्रीराम आणि केवट भेट 3)नल नील आणि प्रभू श्रीराम 3) रावण वध 4)आपल्याला आवडणारा "रामायणा " मधील प्रसंग आशा विविध विषयांवर चित्र काढायची स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. यावेळी कलारंगचे अध्यक्ष अमित गोरखे यांच्या संकल्पनेतून तसेच विश्व हिंदू परिषद पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष धनंजय गावडे यांच्या सहयोगाने या भव्य चित्रकलेचे स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.

आशा स्वरुपाचे बक्षिस ठेवण्यात आली : लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत संपुर्ण वातावरण राममय झाले होते. या स्पर्धेला विशेष बक्षिस देखील ठेवण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मरणार्थ रोख १५,००० रुपये आणि स्मृतिचिन्ह, द्वितीय पारितोषिक दिवंगत हिराबाई किसनराव लांडगे यांच्या स्मरणार्थ रूपये १०,००० रुपये आणि स्मृतिचिन्ह, तृतीय पारितोषिक दिवंगत गणपतराव गोरखे यांच्या स्मरणार्थ रोख ७,५०० रुपये आणि स्मृतिचिन्ह, चतुर्थ पारितोषिक दिवंगत सुरेश गादिया यांच्या स्मरणार्थ रोख ५,००० रुपये आणि स्मृतीचिन्ह, दिवंगत सुनंदा यशवंत मिठभाकरे यांच्या स्मरणार्थ रोख २१०० रुपये आणि स्मृतिचिन्ह ठेवण्यात आले आहे. लवकरच या बक्षिसांचे वितरण देखील करण्यात येणार.

चित्रांचे प्रदर्शन भरणार : या सर्व चित्रांचे प्रदर्शन देखील ठेवण्यात येणार आहे. या स्पर्धेला हेमंत हरहरे, निगडी प्राधिकरण माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, पिंपरी चिंचवड विश्व हिंदू परिषद अध्यक्ष धनंजय गावडे, जिल्हा सहमंत्री विशाल मासुळकर, विभाग मंत्री नितीन वाटकर, नगरसेविका अनुराधा ताई गोरखे, पिंपरी चिंचवड भाजपा उपाध्यक्ष राजु दुर्गे, भाजपा पदाधिकारी कैलास कुटे, गणेश लंगोटे, मनिषा शिंदे, आदि मान्यवर उपस्थीत होते. या स्पर्धेला परीक्षक म्हणून प्रसिद्ध फोटोग्राफर देवदत्त कशाळीकर, प्रसिद्ध चित्रकार सुनील शेगावकर, सुमित काटकर, जोती कुंभार यांनी परिक्षण केलं.

विद्यार्थ्यांनी रेखाटली सुंदर चित्रे :लहान मुलांनी अतिशय अभ्यासपूर्वक चित्र काढली. यावेळी बोलताना देवदत्त कशाळीकर म्हणाले की, एकावेळी हजारो विद्यार्थी श्रीरामा विषयी विचार करून चित्र रेखाटतात. ही अभूतपूर्व संकल्पना आहे. धनंजय गावडे म्हणाले की, सर्व विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर चित्र रेखाटले आहे. सर्व स्पर्धकांचे परीक्षकांचे पाहुण्यांचे कलारंगाचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी आभार मानले.

हेही वाचा -

  1. मराठमोळा रांगोळी कलाकार पोहोचला थेट अयोध्येत; आकर्षक रांगोळ्यांची रामभक्तांना भुरळ
  2. 22 जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर
  3. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येसह अवघा देश सजला; सांगलीच्या तरुणाची अयोध्या नगरीत रांगोळी

ABOUT THE AUTHOR

...view details