महाराष्ट्र

maharashtra

धर्मावर आधारित आरक्षणाचं विधान करून समाजातील तणाव वाढविण्याचा प्रयत्न-शरद पवारांची पंतप्रधानांवर टीका - Sharad Pawar

By ETV Bharat Marathi Team

Published : May 2, 2024, 10:58 AM IST

Updated : May 2, 2024, 11:05 AM IST

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. पंतप्रधानांचे भाषण हे वस्तुस्थिती आणि सत्यस्थितीवर आधारित नव्हते, अशी टीका माजी केंद्रीय कृषीमंत्री पवार यांनी केली. ते कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

Sharad Pawar criticizes PM Narendra
Sharad Pawar criticizes PM Narendra

कोल्हापूर- राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार म्हणाले, " ज्या मुलभूत समस्यांना नागरिकांना तोंड द्यावं लागते, त्याबाबत पंतप्रधान काहीही बोलत नाहीत. ते दुसरीकडं लक्ष वळवितात. यापूर्वी कधीही वस्तुस्थितीवर आधारित नसेले पंतप्रधानांचे भाषण ऐकलं नाही. राज्यात पाच टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक होत असल्याबाबत शरद पवारांनी आश्चर्य व्यक्त केलं. पाच टप्प्यांतील निवडणुकीमुळे पंतप्रधान मोदींना जास्तीत जास्त सभा घेणं शक्य होतं. सत्तेत असणाऱ्यांना काळजी आहे, असा टोलाही माजी केंद्रीय कृषीमंत्री पवार यांनी लगावला.

शरद पवार म्हणाले, " इंडिया आघाडीला मत दिले तर सत्तेत आल्यावर इंडिया आघाडीकडून धर्मावर आधारित आरक्षण दिले जाईल, असा पंतप्रधान मोदींनी अनेकदा आरोप केला. त्यावर माजी केंद्रीय कृषीमंत्री म्हणाले, "धर्मावर आधारित आरक्षणाचं विधान करून समाजातील तणाव वाढविण्याचा प्रयत्न आहे. आम्ही धर्मावर आधारित आरक्षणाबाबत कधीच बोललो नाही. ती मोदींची निर्मिती आहे. वारसा कर आणि संपत्तीच्या पुनर्वाटपावरून मोदी यांनी इंडिया आघाडीवर आरोप केले आहेत. त्याचाही काँग्रेसनं जाहीरनाम्यात उल्लेख केला नाही," याकडं शरद पवार यांनी लक्ष वेधलं.

राज्यकर्त्यांकडून लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहेत. पाच वर्षात पाच पंतप्रधान हा जावईशोध पंतप्रधान मोदींनी कुठून लावला? इंडिया आघाडी आघाडीचे लोक एकत्र बसून पंतप्रधानाच्या उमेदवाराबाबत निर्णय घेणार आहोत. निवडून येणे शक्य असलेल्या सर्व जागा लढविणार आहोत-राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट नाव न घेता शरद पवार यांना महाराष्ट्रातील 'भटकती आत्मा' असे म्हटले होते. "जर त्यांना यश मिळाले नाही तर दुसऱ्याच्या चांगल्या कामाचा नाश करतात. महाराष्ट्र त्यासाठी पीडित आहे," असेही मोदींनी म्हटले. त्यावर शरद पवार म्हणाले, " केवळ मला आणि उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्यात त्यांना समाधान मिळते." मतदानांच्या टक्केवारीवरही शरद पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मतदानाची टक्केवारी काळजी करण्यासारखी असल्याचं राष्ट्रवादीच्या संस्थापकांनी म्हटलं.

  • एनसीपी (एसपी) महाविकास आघाडीचा घटक पक्ष असून राज्यातील ४८ लोकसभापैकी १० जागा लढत आहे. तर शिवसेना ठाकरे पक्ष २१ तर काँग्रेस १७ जागा लढवित आहे.

हेही वाचा-

  1. "...हे शरद पवारांनी कोल्हापुरात येऊन म्हणावं", संजय मंडलिकांचं ओपन चॅलेंज - Lok Sabha Election 2024
  2. 'होय मी भटकती आत्मा'; माझा आत्मा स्वतःसाठी नाही, जनतेसाठी अस्वस्थ होतो - शरद पवार - Sharad Pawar replied Narendra Modi
  3. मावळत्या सूर्याच्या साक्षीनं खोटी शपथ घेणाऱ्यांना शिक्षा करण्याची वेळ, मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल - PM Modi Malshiras Sabha
Last Updated :May 2, 2024, 11:05 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details