महाराष्ट्र

maharashtra

2014 नंतर 17 लाख हिंदू कुटुंबांनी नागरिकत्व का सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भागवत यांना सवाल - Lok Sabha Election 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 29, 2024, 7:40 PM IST

Lok Sabha Election 2024 : 12 लाख कुटुंब हे भारताचे नागरिकत्व सोडून गेले, ज्यांची मालमत्ता 50 कोटींच्या पुढे आहे. यात मुसलमान नाही, ख्रिश्चन नाही, तर ही सर्व हिंदू कुटुंबं आहेत, असं आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले. पुण्यात पत्रकार परिषदत मध्ये ते बोलत होते. या हिंदूनी भारत का सोडला याचा जाब त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना विचारला.

Prakash Ambedkar
प्रकाश आंबेडकर

प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर

पुणे Lok Sabha Election 2024 :देशात 2014 ते राज्यसभेमध्ये उत्तर देईपर्यंत शासनाचा माहितीनुसार, या 17 लाख हिंदू कुटुंबं ज्यांची मालमत्ता कमीत कमी 50 कोटींच्या पुढे आहे, अशा या कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं आणि ते विदेशात गेले. आज नवीन मतदार विचारत आहे की, ज्या काही लोकंनी नागरिकत्व सोडलं आहे, अशा लोकांना इलेक्टरोल बँडची सक्ती केली होती का? ही सक्ती सहन होत नाही म्हणून या लोकांनी नागरिकत्व सोडलं का? यावर मोहन भागवत यांनी उत्तर द्यावं करावं असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी म्हटलंय.

असे पंतप्रधान पुन्हा चालतील का: देशात ज्या नागरिकांनी नागरिकत्व सोडलं आहे ती सर्व कुटुंबं हिंदू आहेत. जे स्वतःला हिंदू समाजाचे ठेकेदार समजत आहेत त्यांनी याचं उत्तर द्यावं हा प्रश्न नवीन मतदार उपस्थित करत आहेत. तसंच 2014 साली जेव्हा नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले तेव्हा जीडीपीचं जे कर्ज होतं ते 100 रू ला 24 रू कर्ज होतं. जेव्हा आज मोदी हे निवडणुकीसाठी येत आहेत तेव्हा याच जीडीपीचं कर्ज हे 84 रू झालंय. 2026 ला ते 96 रू होणार आहे. त्यामुळं आत्ता अशाच व्यक्तीला पुन्हा पंतप्रधान करायचं का? हा युवा वर्गात असलेल्या सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पंतप्रधान मोदी देखील याचं उत्तर देत नाहीत, असं आंबेडकर म्हणाले.

दोन्ही टप्प्यात 55 टक्के मतदान : पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचं मतदान झालंय. आत्ता तिसऱ्या टप्प्याला सुरूवात झालीय. 2019 साली भाजपाच्या ज्या नेत्यांना लाख लाख मते मिळाली होती आणि 2014 ला जे नवीन मतदार होते, ज्यांना काँग्रेसची चीड होती तेच मतदार आत्ता भाजपाकडं नाहीत अशी परिस्थिती आहे. आज दोन्ही टप्प्यात मतदान 55 टक्के झालंय. जे 10 ते 12 टक्के मतदान झालं नाही ते भाजपाचं मतदान आहे आणि त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात भाजपाला वर्चस्व नाही अशी परिस्थिती आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात काही ठिकाणी काँग्रेस, भाजपा आणि वंचितमध्ये रेस आहे. जो कोणी जिंकेल तो 25 हजार मतांनी जिंकणार आहे. उरलेले टप्पे देखील असेच चालणार आहेत. सरप्राईज देणारे निकाल लागणार असणार आहेत, असं आंबेडकर म्हणाले.



लोकसभेचं खातं नक्की उघडू : पहिल्या टप्प्यात जरांगे फॅक्टर हे दिसला नाही. परंतु, मराठवाड्यात जरांगे फॅक्टर दिसत आहे. वंचितनं राज्यात अनेक ठिकाणी उमेदवार दिले आहेत. बारामतीत त्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. याबाबत आंबेडकर यांना विचारला असता ते म्हणाले की, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील येऊन भेटून त्यांनी विनंती केल्यामुळं मी बारामतीमध्ये उमेदवार दिला नाही. तसंच वंचितबाबत आंबेडकर यांना विचारलं असता ते म्हणाले की, यावेळी आम्ही आमचं लोकसभेचं खात नक्की उघडू.

हेही वाचा -

  1. बाप्पा यांना पाव रे! अरविंद सावंत, अनिल देसाईंसह राहुल शेवाळे अर्ज दाखल करण्यापूर्वी सिद्धिविनायकाच्या चरणी - Lok Sabha Election
  2. पंतप्रधान मोदींचं मिशन महाराष्ट्र! आज आणि उद्या राज्यात घेणार सहा सभा, भर उन्हात तापणार राजकारण - LOK SABHA ELECTION 2024
  3. 'अटलजींचा आत्मा ढसाढसा रडत असेल'; उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले? - Lok Sabha Election

ABOUT THE AUTHOR

...view details