महाराष्ट्र

maharashtra

भाजपात घरवापसी करण्यापूर्वीच एकनाथ खडसेंना धमकी; दाऊद, छोटा शकील टोळीकडून अमेरिकेतून आला फोन - Eknath Khadse

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 17, 2024, 9:58 AM IST

Updated : Apr 17, 2024, 4:32 PM IST

Eknath Khadse : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना जीवे मारण्याच्या धमक्यांचे फोन आल्यानं एकच खळबळ उडालीय. चार विविध फोन नंबरवरुन त्यांना धमकी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Eknath Khadse
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे

एकनाथ खडसे यांची पत्रकार परिषद

जळगाव Eknath Khadse : राज्याचे माजी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आल्याचं समोर आलंय. यामुळं एकच खळबळ उडालीय. धमकीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. याप्रकरणी एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केलाय. चार वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून 15 तसंच 16 एप्रिल रोजी फोनवरून धमकी दिल्याचं खडसे यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

वेगवेगळ्या नंबरवरुन धमक्यांचे फोन : एकनाथ खडसे यांना आतापर्यंत धमकीचे चार ते पाच फोन आले. हे फोन वेगवेगळ्या नंबरवरुन आले. फोन उत्तर प्रदेशच्या लखनऊ तसंत अमेरिकेतून आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. एकनाथ खडसे यांना यापूर्वीही मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम, छोटा शकील गँगकडून धमकी देण्यात आली होती. विशेष म्हणजे हे धमकीचे फोन कुख्यात गुंड तसंच मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील गँगकडून आल्याचा दावा फोनवर करण्यात आला आहे.

अमेरिकेतील फोन क्रमांकावरुन धमकीचे फोन आले. याप्रकरणी काही तथ्य वाटत नाही. कोणीतरी खोडसाळपणा केला आहे, असं मला वाटतं. याबाबत आपण कोणतीही सुरक्षा मागितली नाही. मी कायम सुरक्षित असतो. मात्र काळजी घ्यावी, म्हणून तक्रार दाखल केली.- एकनाथ खडसे, माजी विरोधी पक्षनेते

धमकीत काय : छोटा शकील आणि दाऊद तुम्हाला मारणार आहेत, असं धमकी देणाऱ्यानं पहिल्यांदा फोनवरुन सांगितलं. मात्र खडसे यांनी हा प्रकार गांभीर्यानं घेतला नाही. त्यानंतर दुसऱ्या फोनवरुन पुन्हा फोन आला. "तुम्हाला सांगितल्यानंतरही तुम्ही काहीच केलं नाही. तुम्हाला ही लोक मारणार आहेत." चार ते पाच वेळा असे फोन आल्यानंतर एकनाथ खडसे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केलीय.

हेही वाचा :

  1. एकनाथ खडसे करणार भाजपा प्रवेश; चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली 'ही' प्रतिक्रिया - Lok Sabha Election 2024
  2. एकनाथ खडसे करणार 'घरवापसी', खडसेंच्या स्वगृही परतण्याबाबत काय म्हणाले सत्ताधारी-विरोधक? - Eknath Khadse
  3. शिवसेनेच्या नेत्याला भाजपाची पालघरमधून उमेदवारी; भाजपाच्या लेटरहेडची काय आहे सत्यता ? - BJP Fake Letter Head
Last Updated : Apr 17, 2024, 4:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details