महाराष्ट्र

maharashtra

Babasaheb Shinde : आमदार खासदार होण्यासाठी पठ्ठ्याने विकली तब्बल पन्नास एकर जमीन; २३ निवडणुका हरला, पुन्हा लोकसभा लढणार

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 20, 2024, 8:18 PM IST

Updated : Mar 20, 2024, 10:07 PM IST

Babasaheb Shinde : देशात 2024 च्या लोकसभा निवडणुकीचं (Lok Sabha Elections) बिगुल वाजलं आहे. अशाताच जालना जिल्ह्यातील एका पठ्ठ्यानं तब्बल पन्नास एकर जमीन विकून अनेक निवडणुका लढल्या आहेत. जाणून घेऊयात बाबासाहेब शिंदे यांची आगळीवेगळी कहाणी.

Babasaheb Shinde
बाबासाहेब शिंदे

आमदार खासदार होण्यासाठी विकली तब्बल पन्नास एकर जमीन

जालना Babasaheb Shinde :लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत (Lok Sabha Elections) तब्बल 23 वेळा सतत पराभवाला सामोरे जाऊनही जालना जिल्ह्यातील एका अवलियानं निवडणूक लढविण्याचा आपला अट्टहास काय सोडलेला नाही. आतापर्यंत निवडणुकीसाठी तब्बल 50 एकर शेती विकल्याचं ते सांगतात. हा अवलिया यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातही उतरणार आहे. बाबासाहेब शिंदे हे असं या अवलियाचं नाव आहे. त्यांनी आतापासूनच प्रचाराला सुरुवातही केलीय.

नातेवाईकांनीही सोडली साथ : सतत पराभव होऊन देखील बाबासाहेब शिंदे यांचं आमदार, खासदार होण्याचं स्वप्न काही पूर्ण होऊ शकलं नाही. निवडणूक लढविण्याची शिंदे यांची हौस त्यांच्या कुटुंबीयासाठी डोकेदुखी ठरली. 50 एकर जमीन गेल्यामुळं त्यांच्या जवळचे नातेवाईक त्यांना सोडून गेले.

निवडणुकीमध्ये केलं डिपॉझिट जप्त: लोकशाहीनं जे दिलेले अधिकार आहेत ते प्रत्येक तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळावी यासाठी राजकारणात उतरलो असल्याचं बाबासाहेब शिंदे सांगतात. सर्व निवडणुकीमध्ये त्यांचं डिपॉझिट जप्त झालं तरीदेखील ते आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. पुन्हा नव्या जोमानं लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत ते आपला उमेदवारी अर्ज भरत आहेत.

1978 सालची सांगितली आठवण: यासंदर्भात बाबसाहेब शिंदे सांगतात, माझा एकच हेतू होता तो म्हणजे लोकशाहीने जे दिलेले अधिकार आहेत ते प्रत्येक तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळावी यासाठी मी राजकारणात उतरलो आहे. आतापर्यंत 9 लोकसभा आणि 14 विधानसभा लढलो. यावेळी त्यांनी त्यांच्या आयुष्यातील बरेच अनुभव सांगितले. यावेळी त्यांनी त्यांच्या आयुष्यातील एक आठवण आवर्जून सांगितली, 1978 ला शिक्षण घेत असताना त्यांना एका विशेष पक्षाकडून ऑफर देण्यात आली होती. पण ती त्यांनी स्वीकारली नाही, असे ते म्हणाले.



हेही वाचा -

  1. Vijay Shivtare: शिवतारेंमुळं महायुतीत मिठाचा खडा? ...तर आम्ही शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाही, अजित दादांच्या कार्यकर्त्यांचा इशारा
  2. Vijay Shivtare: शिवतारेंमुळं महायुतीत मिठाचा खडा? ...तर आम्ही शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाही, अजित दादांच्या कार्यकर्त्यांचा इशारा
  3. BRS Party in Maharashtra : तेलंगणातील सत्ता जाताच 'बीआरएस'ची कार महाराष्ट्रात 'पंक्चर', कार्यकर्त्यांसह नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
Last Updated : Mar 20, 2024, 10:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details