महाराष्ट्र

maharashtra

पाहा सचिन तेंडुलकरचे जम्मू-काश्मीर दौऱ्यावरचे फोटो

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 17, 2024, 5:01 PM IST

क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज शनिवारी आपल्या कुटुंबासह जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात आला आहे. त्यानं यावेळी अवंतीपोराजवळील चारसू येथील बॅट निर्मिती कारखान्याला भेट दिली. त्याचे काही आकर्षक फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज सचिन तेंडुलकरने भलेही क्रिकेट सोडले असले तरी त्याच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही.
आजकाल मास्टर ब्लास्टर आपल्या कुटुंबासह काश्मीर दौऱ्यावर आहे.
पत्नीसोबत ताजमहाल पाहिल्यानंतर सचिन तेंडुलकर आता काश्मीरच्या दौऱ्यावर आहे.
क्रिकेटचा देव म्हणल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर पाहण्यासाठी खूप गर्दी जमली होती.
सचिन तेंडुलकर आज शनिवारी 17 फेब्रुवारी रोजी आपल्या कुटुंबासह जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात आहे.
या दौऱ्यादरम्यान सचिननं अवंतीपोराजवळील चारसू येथील बॅट निर्मिती कारखान्याला भेट दिली.
सचिन तेंडुलकर सध्या काश्मीरमध्ये कुटुंबासोबत वेळ घालवत आहे.
सचिन तेंडुलकर जेव्हा काश्मीरमध्ये बॅट बनवण्याच्या कारखान्यात पोहोचला, तेव्हा त्यानं तिथे खाण्यापिण्याचा आनंदही घेतला.
सचिन तेंडुलकरला पाहिल्यानंतर त्याचे चाहते त्याच्याभोवती जमले आणि त्यांचे फोटोही क्लिक करू लागले.
यावेळी सचिनची मुलगी सारा आणि पत्नी अंजलीच्या हातातही बॅट दिसली.
सचिन तेंडुलकरनं या भेटीदरम्यान, क्रिकेट बॅट तयार करण्यात गुंतलेल्या कारागिरीचे कौतुक केले.
सचिन तेंडुलकर चारसू येथून निघून गेल्यावर, फॅक्टरीत उत्साह आणि प्रेरणाचे वातावरण निर्माण झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details