महाराष्ट्र

maharashtra

सानिया मिर्झाच्या चाहत्यांकडून शोएब मलिक ट्रोल, तिसरं लग्न केल्यानं सुनावलं!

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 21, 2024, 11:01 AM IST

Shoaib and Sania Divorce : पाकिस्तानी माजी क्रिकेटर शोएब मलिक आणि भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हे सध्या खूप चर्चेत आहे. शोएबनं सना जावेदशी तिसरे लग्न केल्यानंतर अनेकजण त्याला सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत.

Shoaib and Sania Divorce
शोएब आणि सानियाचा घटस्फोट

मुंबई - Shoaib and Sania Divorce : पाकिस्तानी माजी क्रिकेटर शोएब मलिक आणि भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा यांचा घटस्फोट झाला आहे. 2010 मध्ये विवाहबद्ध झालेले हे जोडपे लग्नाच्या 14 वर्षानंतर वेगळे झाले आहे. घटस्फोटानंतर शोएबनं पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केलं आहे. शोएब मलिकचं हे तिसरे लग्न आहे. सानियापूर्वी शोएबनं आयेशा सिद्दीकीशी लग्न केलं होतं. सानिया आणि शोएब परस्पर संमतीनं एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. शोएब मलिक आणि सानिया मिर्झाला एक मुलगा इझान आहे. इझान हा सानियासोबत दुबईत राहणार आहे. सानिया आणि शोएब मिळून त्यांच्या मुलाची जबाबदारी घेणार आहेत.

शोएब मलिकनं केला निकाह : शोएब मलिकनं 18 जानेवारी 2024 रोजी पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी निकाह केला असून या लग्नामधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोवर अनेकजण कमेंट्स करून शोएब मलिकला ट्रोल करत आहेत. अनेकजण सानिया मिर्झाला पाठिंबा देताना दिसत आहेत. शोएबला काही पाकिस्तानी लोक विश्वासघाती असल्याचं म्हणताना दिसत आहेत. 20 जानेवारी रोजी सोशल मीडियावर शोएब आणि सनाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांना धक्का बसला.

  • सानियाच्या एका चाहत्यानं पोस्टवर कमेंट करत प्रेमावरून विश्वास उठल्याचं म्हटलं आहे. टीव्ही विकून रिमोट घेतल्याचा टोलाही लगावला.सानियानं शोएबसोबत लग्न केलं, तेव्हादेखील चाहत्यांनी सुनावलं. अनेकांनी तिला खूप काही सुनावलं होतं. तर काही एक्स वापकर्त्यांनी सानियाबद्दल वाईट वाटतं असल्याची भावना व्यक्त केली.

कोण आहे सना जावेद? : शोएबच्या आधी अभिनेत्री सना जावेदनं पाकिस्तानी अभिनेता आणि गायक उमेर जसवालशी लग्न केलं होतं. अनेक टीव्ही मालिकांमध्ये दिसलेली सना ही पाकिस्ताचं एक प्रसिद्ध नाव आहे. सनानं 'रुसवाई', 'डर खुदा से', 'खानी', 'ए मुश्त-ए-खाक', 'डंक', 'प्यारे अफजल', 'काला डोरिया' , 'रोमियो वेड्स हीर' या मालिकांमध्ये काम केलं आहेत. सध्या ती एआरव्हाय (ARY) वाहिनीवरील 'सुकून' या मालिकेत काम करत आहे. दरम्यान सना आणि शोएबमध्ये जवळपास 11 वर्षाचा फरक आहे. सना ही शोएबपेक्षा 11 वर्षांनी लहान आहे. याशिवाय सानिया ही शोएबपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. शोएब आणि सानियानं गेल्या वर्षी स्पॉटिफाईवर 'द मिर्झा मलिक शो' नावाचा चॅट शो होस्ट केला होता. हा शो खूप लोकप्रिय होता.

हेही वाचा :

  1. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्यात झालेला 'खुला' काय आहे?
  2. सानिया मिर्झाशी घटस्फोटाच्या अफवा असताना शोएब मलिकनं पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी केलं लग्न
  3. विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्नानं अखेर त्यांच्या साखरपुड्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया

ABOUT THE AUTHOR

...view details