महाराष्ट्र

maharashtra

भावूक झालेल्या फॅनसाठी शाहरुख खानही झाला हळवा, व्हिडिओ व्हायरल

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 30, 2024, 10:21 AM IST

शाहरुख खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये तो फॅनसोबत इमोशनली संवाद साधताना आणि फोटोसाठी पोज देताना दिसत आहे. शाहरुखच्या फॅन क्लबने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

Shah Rukh Khan
शाहरुख खान

मुंबई- कलेबद्दल असलेलं समर्पण आणि कठोर मेहनत करण्याची निरंतर तयारी यामुळे शाहरुख खानला लोकप्रियतेचा कळस पाहता आला याबद्दल कोणच्याच मनात शंका नाही. तो जेव्हा सेलेब्रिटीशी किंवा सामान्य प्रशंसकाशी भेटतो तेव्हा तो जितक्या प्रेमळपणाने आणि आपलेपणाने त्याचे स्वागत करतो त्यामुळे तो वेगळा ठरतो. त्याचं हृदय किती मोठं आहे याचा प्रत्यय त्याला भेटणाऱ्या असंख्यांना आलाय. व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये शाहरुख खान एका भारावून गेलेल्या चाहत्याला भेटताना दिसतो. त्या चाहत्याला तो शांत करतो आणि अतिशय आपुलकीनं त्याला वागणूक देताना दिसतो.

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख अलिकडेच त्याच्या 'डंकी' चित्रपटाच्या प्रीमियर शो दरम्यान चाहत्यांशी संवाद साधत होता. यावेळी त्याला त्याचा एक समर्पित चाहता भेटला आणि शाहरुखला पाहून त्याचे स्वतःवरील नियंत्रण सुटले. भारवलेला तो चाहता किंग खानला पाहून आपले अश्रू रोखू शकत नव्हता. त्याचे शरीर थरथर कापत होते.

डार्क गॉगल ,साधा काळा टी-शर्ट आणि काळ्या लेदर जॅकेट घातलेला शाहरुख खान व्हिडिओमध्ये स्टायलिश दिसत आहे. यावेळी शाहरुखने त्याला हळूवार मिठी मारून धीर दिला. तो शांत होण्यासाठी त्याचे खांदे पकडून संवाद साधला. शाहरुखनं भावूक झालेल्या चाहत्याचा हात पकडला आणि त्याच्यासोबत फोटोसाठी पोज दिली.

त्याच्या चित्रपटांबद्दल सांगायचे तर, शाहरुख खान 2018 पासून रुपेरी पडद्यापासून काही काळ दूर गेला होता. त्यापूर्वी त्याने अनुष्का शर्मा, कतरिना कैफ, अभय देओल, आर. माधवन, मोहम्मद झीशान अय्युब आणि इतरांसोबत झीरो या कॉमेडी-ड्रामा चित्रपटात काम केले होते. त्यानंतर 2023 पर्यंत त्याच्या पुनरागमनाची प्रतीक्षा चाहत्यांना करावी लागली आणि या एकाच वर्षात त्यानं 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' या तीन सुपरहिट चित्रपटात भूमिका केल्या. शाहरुखने अद्याप त्याच्या आगामी चित्रपटाचा खुलासा केलेला नाही, तथापि, तो बहुधा त्याची मुलगी सुहाना खानसोबत 'किंग' या अ‍ॅक्शन चित्रपटात दिसणार आहे.

हेही वाचा -

  1. आयुष्मान खुरानानं दिली मुंबईत साऊथ कोरियन गायक एरिक नमला ट्रिट
  2. 'बिग बॉस 17' हारल्यानंतर अंकिता लोखंडेनं शेअर केली पोस्ट
  3. पती निक जोनास भारतात परफॉर्मन्स करत असताना प्रियांका चोप्राचे मालती मेरीसोबत डे आऊट

ABOUT THE AUTHOR

...view details