महाराष्ट्र

maharashtra

Tiger 3 World Tv Premiere : 'टायगर 3'चा होणार वर्ल्ड टीव्ही प्रीमियर , पाहा 'या' दिवशी चित्रपट

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 16, 2024, 10:16 AM IST

Updated : Mar 16, 2024, 10:32 AM IST

Tiger 3 World Tv Premiere : 'टायगर 3'चा वर्ल्ड टीव्ही प्रीमियर स्टार गोल्डवर होणार आहे. सलमान खान आणि कतरिना कैफ अभिनीत हा चित्रपट टीव्हीवर पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत.

Tiger 3 On Star Gold
टायगर 3 स्टार गोल्डवर

मुंबई -Tiger 3 World Tv Premiere :अभिनेता सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी स्टारर सुपरहिट चित्रपट आता अनेकांना घरी बसून पाहता येणार आहे. चित्रपटगृहांमध्ये 12 नोव्हेंबर 2023 रोजी प्रदर्शित झालेला 'टायगर 3'चा वर्ल्ड टीव्ही प्रीमियर स्टार गोल्डवर होणार आहे. स्टार प्लसच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये अशी माहिती देण्यात आली आहे की, 'टायगर 3'चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर 16 आणि 17 मार्च रोजी स्टार गोल्डवर होईल. आता या चित्रपटाबाबत ही अपडेट शेअर करताना सलमान खानने त्याच्या इन्स्टाग्रामवर लिहिलं, ''टायगर आणि झोया नवीन मिशन पूर्ण करण्यासाठी तयार आहेत... तुम्ही तयार आहात का? 'टायगर 3'चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर शनिवार 16 मार्च रोजी रात्री 8 वाजता आणि रविवार 17 मार्च दुपारी 12 वाजता फक्त स्टार गोल्डवर पाहा.''

'टायगर 3'चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर :सलमान खाननं शेअर केलेल्या या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. भाईजानचे काही चाहते या पोस्टवर कमेंट्स करून हा चित्रपट नक्की पाहू असल्याचं म्हणत आहेत. 'टायगर 3'चं दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केलंय. या चित्रपटाचं बजेट 300 कोटी रुपये असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला होता. जगभरात या चित्रपटानं 466.63 कोटींची कमाई केली होती. 'टायगर 3' हा ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे, ज्याचा निर्माता आदित्य चोप्रा आहे. या चित्रपटाला यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनवण्यात आलं आहे.

सलमान खानचे आगामी चित्रपट :टायगर फ्रॅन्चायझीचा पहिला भाग 'एक था टायगर' हा 2012 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन कबीर खान यांनी केलं होत. यानंतर 2017 रोजी 'टायगर जिंदा है'चा हा दुसरा सीक्वल आला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. यशराज फिल्म्सचा स्पाई यूनिवर्सचा पाचवा चित्रपट आहे. दरम्यान सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर पुढं तो ' किक 2', 'टायगर वर्सेस पठाण', 'द बुल , 'दबंग 4' या चित्रपटामध्ये दिसणार आहेत.

हेही वाचा :

  1. Aamir Khan breakfast with media : ब्रेकफास्टचे निमंत्रण देऊन आमिर खाननं मीडिया सहकाऱ्यांसोबत मारल्या गप्पा
  2. सोनू सूदच्या दिग्दर्शिय पदार्पणाचा चित्रपट 'फतेह'चे पहिले पोस्टर लॉन्च
  3. ग्लोबल गायक एड शीरनने 'किंग खान' आणि गौरी खानसाठी केला परफॉर्मन्स, 'मन्नत'मधील व्हिडिओ व्हायरल
Last Updated :Mar 16, 2024, 10:32 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details