महाराष्ट्र

maharashtra

पोलिसांच्या गणवेशात रजनीकांतची स्टायलिश एन्ट्री, 'वेट्टयान'च्या सेटवरील व्हिडिओ व्हायरल

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 28, 2024, 3:43 PM IST

Rajinikanth in cop uniform : रजनीकांत अलीकडेच त्याच्या आगामी 'वेट्टयान' या चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू करण्यासाठी चेन्नईहून हैदराबादला दाखल झाला. त्यानंतर सेटवरील त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Rajinikanth
रजनीकांत

हैदराबाद - Rajinikanth in cop uniform : सुपरस्टार रजनीकांतने, त्याच्या 'वेट्टयान' या चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू करण्यासाठी चेन्नईहून हैदराबादला विमानाने पोहोचला. त्याच्या आगामी 'वेट्टयान' या चित्रपटात त्याची फहद फसिलसह भूमिका आहे. चित्रपटाच्या सेटवरील रजनीकांतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रजनीकांत त्याच्या 'वेट्टयान' चित्रपटाच्या सेटवर कारमधून येताना दिसत आहेत. रजनीकांतला भेटून चाहते आनंदित झाले आणि आनंदाने त्याच्या नावाचा जयघोष करु लागले. त्याहूनही गमतीची गोष्ट म्हणजे रजनीकांत पोलिसांचा गणवेश परिधान केलेला दिसत होता. या चित्रपटात तो पोलिसाची भूमिका करणार असल्याचे समजते.

पोलिसांच्या पोशाखात रजनीकांतला पाहून चाहत्यांच्या मनात आनंदाची लाट पसरली होती. या चित्रपटामध्ये तो निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची भूमिका करत असून तो प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करताना दिसणार आहे. 'वेट्टयान'च्या सेटवरील अनेक फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर शेअर करण्यात आले आहेत. यामुळे चित्रपटाच्या सभोवतालची चर्चा वाढली आहे. रजनीकांत चित्रपटाच्या एका दृश्याची तयारी करताना दिसत आहेत. यावेळी रजनीने हिरवा स्ट्रीप शर्ट, क्रीम ट्राउझर्स, तपकिरी शूज आणि त्याच्या स्टाईल सिग्नेचरचा चष्मा घातला होता.

नुकताच निर्मात्यांनी चित्रपटाचा एक प्रमोशनल व्हिडिओ शेअर केला आहे. याची सुरुवात रजनीकांतने फ्रेममध्ये सुभाषचंद्र बोस यांचे मुखपृष्ठ असलेल्या पुस्तकाच्या वाचनाने केली. चित्रपटातील दुसऱ्या शॉटमध्ये, तो लाकडी काठी किंवा लाठी धरलेला दिसत होता. यामुळे तो वेट्टयानमध्ये एखाद्या वृद्ध माणसाची भूमिका करत असावा अशी शंका निर्माण झाली. असे असले तरी त्याच्या पात्राबद्दलचे गूढ अद्याप उकलेलं नाही.

याआधी, त्याच्या नवीन चित्रपटाबद्दल चर्चा करताना रजनीकांतने सांगितले की, "'वेट्टयान' चित्रपटाचे शूटिंग जवळपास 80 टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे आणि उर्वरित 20 टक्के काम प्रगतीपथावर आहे." या चित्रपटात अमिताभ बच्चन, फहाद फासिल, राणा दग्गुबती, दुशारा विजयन आणि रितिका सिंग यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट 2024 च्या उत्तरार्धात प्रदर्शित होणार आहे. टीजे ज्ञानवेल राजा दिग्दर्शित 'वेट्टयान' नंतर, रजनीकांत कनागराज दिग्दर्शित 'थलैयवा 171' या चित्रपटात काम करणार आहे.

हेही वाचा -

  1. 'योद्धा'च्या ट्रेलर रिलीजपूर्वी सिद्धार्थ मल्होत्राने दिला 'अभूतपूर्व थरार' असल्याचा संकेत
  2. 'बडे मियाँ छोटे मियाँ' मधील 'मस्त मलंग झूम' गाणं रिलीज ; पाहा व्हिडिओ
  3. आमिर- किरण रावने होस्ट केले 'लापता लेडीज'चे स्क्रीनिंग; काजोल, करण, आयरा आणि नुपूरची स्टाईलमध्ये हजेरी

ABOUT THE AUTHOR

...view details