महाराष्ट्र

maharashtra

पाकिस्तानी तरुंगात अडकलेल्या मच्छीमारांची प्रेरणादायी गोष्ट 'थांडेल', नागा चैतन्यने सांगितला प्रेमकथेचा तपशील - Sai Pallavi in Thandel

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 26, 2024, 12:09 PM IST

Sai Pallavi in Thandel : नागा चैतन्य आगामी 'थांडेल' या सत्यकथेवर आधारित चित्रपटात साई पल्लवी बरोबर काम करत आहे. आंध्र प्रदेशातील काही मच्छीमार गुजरातच्या समुद्रातून चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेले. त्यांना अटक करुन दीड वर्षे तुरुंगात डांबण्यात आलं होतं. त्यांची सुटका आणि परतीची प्रेरणादायी गोष्ट या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

Sai Pallavi in Thandel
नागा चैतन्य

हैदराबाद- Sai Pallavi in Thandel : अभिनेता नागा चैतन्य साऊथ स्टार असला तरी 'लाल सिंग चढ्ढा' चित्रपटानंतर त्याचं हिंदी सिनेसृष्टीतही चांगला नावं झालंय. नागार्जुनचा मुलगा आणि सामंथा रुथ प्रभूचा माजी पती म्हणूनही त्याची ओळख आहे. अलिकडे शोभिता धुलिपाला बरोबरच्या त्याच्या डेटिंगच्या बातम्यांमुळेही तो चर्चेत असतो. नागा चैतन्य आता साऊथची लोकप्रिय अभिनेत्री साई पल्लीबरोबर एक प्रेमकथेवर आधारित चित्रपट करत असून सत्य कथेवर आधारित असलेलं हे कथानक खूप रंजक आहे. चंदू मोंडेटी दिग्दर्शित 'थांडेल' या चित्रपटत प्रेरणादायी चित्रपटात काम करता आलं, याबद्दल त्यानं कृतज्ञता व्यक्त केली आहे.

चंदू मोंडेटी दिग्दर्शित 'थांडेल' चित्रपटाबद्दल बोलताना, नागा चैतन्यने शेअर केले की हा चित्रपट अनेक कारणांमुळे त्याच्या हृदयाच्या खूप जवळचा आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, नागानं चित्रपटाच्या कथानकाबद्दल आणि त्याच्या पात्राबद्दल सांगितलं. आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम येथील मच्छिमार समुद्रात चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेले आणि त्यांना पकडण्यात आले होते. 2018 मधील या सत्य घटनेवर आधारित 'थंडेल' चित्रपट आहे. तो म्हणाला, 'थांडेल' हा माझ्यासाठी खूप खास चित्रपट आहे कारण तो खऱ्या घटनांपासून प्रेरित आहे.

"थांडेल या चित्रपटावर मी गेल्या काही काळापासून काम करत आहे, तो माझ्यासाठी खूप खास चित्रपट आहे. पहिली गोष्ट म्हणजे अशा प्रकारचे पात्र साकारण्याचा मी कधीच प्रयत्न केला नव्हता. हा 2018 मधील सत्य घटनांवर आधारित असलेल्या या चित्रपटात श्रीकाकुलम येथील मच्छिमारांचा समावेश आहे. हे मच्छीमार गुजरातच्या समुद्रात मासेमारी करताना ते चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेले आणि त्यांना पकडण्यात आले होते.", असे नागा चैतन्याने सांगितलं.

नागा चैतन्यानं या मच्छिमारांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे अनुभव जाणून घेतले. चित्रपटाची प्रेमकथाही या मच्छीमारांमधील एका जोडप्यावरून रेखाटण्यात आली आहे. चैतन्य यांनी सांगितलं की, "त्यांना पाकिस्तानमध्ये अटक केल्यानंतर त्यांना अनेक संघर्षाला सामोरं जावं लागलं. दीड वर्षे त्यांनी तुरुंगात घालवले. ते यातून कसे सुटले आणि परत आले याची प्रेरणादायी कथा यात दाखवण्यात आली आहे."

" या चित्रपटाची कथा मच्छिमारांच्या सुटकेसाठी लढलेल्या खऱ्या जोडप्यावर आधारित आहे. या चित्रपटातील माझ्या आणि साईच्या प्रेमकथेत जे घडले ते सत्य आहे. वास्तविक जीवनातील हे जोडपं आता विवाहित आहे. त्याच्या पत्नीनं या मच्छिमारांसाठी लढा दिला आणि त्यांना भारतात परत आणण्यासाठी सरकारला प्रवृत्त केलं. ही गोष्ट तुमच्यापर्यंत आणण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे," असं नागा चैतन्य म्हणाला.

ABOUT THE AUTHOR

...view details