महाराष्ट्र

maharashtra

मुनावर फारुकीविरोधात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, अवैध पदार्थ सेवन करताना घेतलं ताब्यात - Munawar faruqui

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 27, 2024, 10:36 AM IST

Munawar faruqui : स्टँड अप कॉमेडियन मुनावर फारुकीवर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अवैध पदार्थ सेवन करताना सापडल्यावर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

Munawar faruqui
मुनावर फारुकी

मुंबई - Munawar faruqui :'बिग बॉस' विजेता मुनावर फारुकी हा नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असतो. तो वादग्रस्त वक्तव्यामुळे तर कधी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रसिद्धीझोतात येत असतो. यावेळी त्याच्यावर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुनावर फारुकीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुनावर हुक्का पार्लरमध्ये अवैध पदार्थ सेवन करताना सापडला होता. दक्षिण मुंबईतील हुक्का पार्लरवरही मोठी कारवाई करण्यात आली आहे. यात त्यालाही इथं पकडण्यात आलं होतं.

मुंबई पोलिसांनी टाकला छापा -मंगळवारी 26 मार्ज रोजी रात्री मुंबई पोलिसांच्या एसएस शाखेनं एका हॉटेलवर छापा टाकला, यामध्ये हुक्का बार देखील होता. मुंबई पोलिसांनी मुनावर फारुकीसह एकूण 14 जणांना ताब्यात घेतलं. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंदवला गेला आहे. हा जामीनपात्र गुन्हा असला तरी पोलिसांनी नोटीस देऊन मुनावरला जाऊ दिलं आहे. एमआरए पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यावर पुढील तपास सुरू आहे. मुंबई पोलिसांनी टाकलेल्या छाप्यादरम्यान तंबाखू, गुटखा आणि हुक्काशी संबंधित उत्पादने जप्त करण्यात आली आहेत.

मुनावर फारुकी वादात सापडला :महाराष्ट्रात हुक्का पार्लरवर बंदी असली तरी अजूनही अनेक ठिकाणी हुक्का पार्लर सुरू आहेत. दरम्यान मुनावरनं 'बिग बॉस 17' च्या विजेतेपदाचा किताब पटकावला आहे. यामुळे तो अनेकदा बॉलिवूडमधील वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये दिसत असतो. तो अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. स्टँड-अप कॉमेडी करताना त्यानं एकदा माता सीताबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. यासाठी त्याला तुरुंगातही जावं लागलं होतं. यानंतर तो 'लॉकअप' या शोमध्ये दिसला. इथे त्याचं नाव अंजली अरोराबरोबर जोडण्यात आलं होतं. यानंतर त्याला पत्नी आणि एक मूलही असल्याचं समोर आलं. त्यानं 'लॉकअप' शो देखील जिंकला होता. हा शो कंगना रणौत होस्ट करत होती. 'बिग बॉस'मध्ये आल्यानंतर आणखी एक खुलासा झाला की मुनावर एकाच वेळी तीन मुलींना डेट करत होता. याशिवाय त्यानं दोन मुलींना लग्नाचे प्रस्तावही पाठवले होते. या शोदरम्यान त्यानं हे मान्य केलं होतं.

हेही वाचा :

  1. नितेश तिवारीच्या 'रामायण'साठी रणबीर कपूर शिकला धनुर्विद्या, कोच बरोबरचे फोटो व्हायरल - Ranbir Kapoor learning Archery
  2. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम जेनिफर बंसीवालनं जिंकलाअसित कुमार मोदी विरुद्ध लैंगिक छळाचा खटला - TMKOC Fame Jennifer Baniswal
  3. बॉबी देओल अभिनीत 'आश्रम 4' वेब सीरीज रिलीजची प्रतीक्षा सुरू - Bobby deol

ABOUT THE AUTHOR

...view details