महाराष्ट्र

maharashtra

शाहरुख खानसाठी मोहनलालच्या घरी होणार डिनर पार्टी, 'जिंदा बंदा'वर थिरकणार दोन सुपरस्टार्स? - Shah Rukh Khan

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 24, 2024, 1:35 PM IST

काही दिवसांपूर्वी मोहनलालने एका अवॉर्ड फंक्शनमध्ये शाहरुखच्या 'जवान' चित्रपटातील 'जिंदा बंदा' या प्रसिद्ध गाण्यावर परफॉर्म केलं होतं. या परर्फामन्सचं किंग खाननं कौतुक केलं होतं. त्यानंतर दोघांमध्ये अनेक ट्विटची देवाण घेवाण झाली. साऊथचा सुपरस्टार मोहनलाल यांच्या ट्विटला शाहरुख खाननं पुन्हा एकदा प्रत्युत्तर दिलं आहे.

Shah Rukh Khan and Mohanlal
शाहरुख खान आणि मोहनलाल

मुंबई- भारतीय चित्रपटसृष्टीतील दोन सुपरस्टार सोशल मीडियावर एकमेकांशी सुखसंवाद साधतात तेव्हा त्यातलं मजा काही औरच असते. दोघांच्याही चाहत्यांना या संवादातून नवी उर्जा, प्रेरणा आणि मैत्रीच्या अनोख्या नात्याचं दर्शन घडतं. बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आणि मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांच्याबाबतीत हाच अनुभव त्यांच्या चाहत्यांनी घेतला.

काही दिवसांपूर्वी मोहनलालने एका अपुरस्कार सोहळ्यात 'जवान' मधील 'जिंदा बंदा' या गाण्यावर शानदार डान्स परफॉर्मन्स दिला होता. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना किंग खानने मल्याळम सुपरस्टार मोहनलालचे कौतुक केलं. या स्तुतीनंतर दोन्ही स्टार्स सोशल मीडियावर मजा-मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहेत. दोघेही एकमेकांच्या ट्विटला सतत रिप्लाय देताना आढळून आलं.

शाहरुख खानच्या या ट्विटला रिट्विट करत मोहनलालनं तातडीनं लिहिलं, "प्रिय शाहरुख, तुमच्यासारखं कोणीही करू शकत नाही. तुम्ही तुमच्या क्लासिक, अनोख्या स्टाईलमध्ये ओरिजन 'ओजी' जिंदा बंदा आहात आणि नेहमीच राहाल. तुमच्या मायेच्या शब्दांबद्दल धन्यवाद. दुसरं म्हणजे, फक्त रात्रीचे जेवण? सकाळी ब्रेकफास्टच्या वेळी 'जिंदा बंदा'वर थोडा डान्स करायला काय हरकत आहे?"

मी माझ्या घरी यजमान म्हणून सेवा करणं जास्त पसंत करेन. ट्विटची ही मालिका फक्त एवढ्यापुरती मर्यादित राहिली नाही. मोहनलालच्या या प्रश्नाला उत्तर देताना शाहरुखने रिट्विट केलं आणि लिहिलं, "ठरलं तर मग सर, तुमच्या घरी की माझ्या?" हे वाक्य पूर्ण करून मोहनलाल यांनी लिहिलं आहे की, "मी माझ्या घरी यजमान म्हणून सेवा करणं जास्त पसंत करेन." या दोन्ही सुपरस्टारमधील चर्चा त्यांच्या चाहत्यांना खूप आवडल्या आहेत.

'जिंदा बंदा' हे गाणं अनिरुद्ध रविचंदर यांनी संगीतबद्ध केलं आहे. अ‍ॅटली यांनी दिग्दर्शन केलेल्या 'जवान' चित्रपटातील मूळ गाण्यावर शाहरुख खान थिरकला होता. या चित्रपटातून साऊथची सुपरस्टार लेडी नयनताराने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. यात अभिनेत्री प्रियमणी आणि सान्या मल्होत्रा ​​यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

हेही वाचा -

  1. 'लाहोर 1947' चित्रपटाद्वारे प्रीती झिंटा करणार बॉलिवूडमध्ये पुनरागमन, फोटो व्हायरल - preity zinta
  2. रणवीर सिंह डिप फेक व्हिडिओ प्रकरण : व्हिडिओ बनवणाऱ्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल, पोलिसांनी पाठवली नोटीस - Ranveer Singh Deep fake Video
  3. 'कुली'साठी रजनीकांतनं घेतलं 300 कोटींचं मानधन, ठरला आशियातील सर्वात महागडा स्टार? - Rajinikanth

ABOUT THE AUTHOR

...view details