महाराष्ट्र

maharashtra

होळीच्या निमित्तानं सोशल मीडियावर अभिनेत्रींनी फोटो आणि व्हिडिओ केले शेअर - Holi celebration

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 25, 2024, 3:59 PM IST

Holi Celebration Of Bollywood Actress : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींनी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ केले शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

Holi Celebration Of Bollywood Actress
होळी सेलिब्रेशन बॉविलूड अभिनेत्रींच

मुंबई - Holi Celebration Of Bollywood Actress : होळी आणि रंगाचा उत्सव अर्थात धुळवड साजरी करण्यात हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मागे नाहीत. अनेक तारकांनी अगदी जल्लोषात धुळवड साजरी केली. सोशल मीडियावर त्यांचे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. आता या अभिनेत्रींचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडत आहेत. सारा अली खानपासून ते पूनम पांडेपर्यंत अनेक अभिनेत्रींनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. या अभिनेत्रींच्या 'किलर स्टाइल्स' पाहण्यासारख्या आहेत.

सारा अली खान :सारा अली खानने बहुरंगी साडीतील व्हिडिओ शेअर करत तिच्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. साराची ही साधी शैली तिच्या चाहत्यांना खूप आवडली आहे. अनेकजण या फोटोवर आता कमेंटस् करून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

पूनम पांडे : दरवर्षीप्रमाणे यंदाही पूनम पांडे होळीच्या रंगात रंगलेली दिसत आहे. तिनं सलवार सूटवरचा एक सुंदर फोटो तिच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. तिनं आपल्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

आकांक्षी पुरी : अभिनेत्री आणि मॉडेल आकांक्षी पुरीनं होळी सणाच्या निमित्तानं सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिचं शरीर रंगात रंगलेलं दिसत आहे. तिच्या चाहत्यांना तिची शैली खूप आवडली आहे. त्यामुळे अनेकजण तिचं कौतुक करणाऱ्या कमेंटस् पोस्ट करत आहेत. याशिवाय काहीजण या फोटोवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.

कियारा अडवाणी : यंदाही बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीनं होळीचा सण साजरा केला. यावेळी तिनं तिचा पती अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राबरोबर होळीचा सण साजरा केला. रंगात डुबलेली जोडी खूपच सुंदर दिसत आहे. या पोस्टवर अनेकजणांच्या कमेंटस् आल्या आहेत.

पलक तिवारी : टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी आणि अभिनेत्री पलक तिवारीनं होळीच्या निमित्तानं सोशल मीडियावर एक सेल्फी शेअर केला आहे. या फोटोत तिच्या चेहऱ्यावर लाल रंग लावला आहे. या पोस्टवर तिनं कॅप्शनमध्ये लिहिले की, ''तुम्हा सर्वांना होळीच्या शुभेच्छा.'' आता पलकला देखील तिचे चाहते होळीच्या शुभेच्छा देत आहेत.

हेही वाचा :

  1. अमिताभ बच्चन ते अल्लू अर्जुनपर्यंत सेलिब्रिटींनी चाहत्यांना दिल्या होळीच्या शुभेच्छा, पाहा पोस्ट - Holi 2024
  2. होळी पार्टीचा आनंद लुटण्यासाठी ही टॉप 5 गाणी प्ले तुमच्या लिस्टमध्ये नक्की सामील करा - Top 5 Holi Song
  3. बच्चन कुटुंबानं पारंपरिक पद्धतीनं साजरा केला 'होलिका दहन' उत्सव - Bachchan family Holika Dahan

ABOUT THE AUTHOR

...view details