महाराष्ट्र

maharashtra

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर 'बडे मियाँ छोटे मियाँ'चा ट्रेलर रिलीज, पाहा व्हिडिओ - Bade Miyan Chote Miyan Trailer OUT

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 26, 2024, 2:26 PM IST

Bade Miyan Chote Miyan Trailer OUT : अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ अभिनीत ॲक्शन-पॅक्ड चित्रपट 'बडे मियाँ छोटे मियाँ'चा ट्रेलर आज 26 मार्च रोजी रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये दोन्ही स्टार्स जोरदार ॲक्शन करताना दिसत आहेत.

Bade Miyan Chote Miyan Trailer OUT
बडे मियाँ छोटे मियाँचं ट्रेलर आऊट

मुंबई - Bade Miyan Chote Miyan Trailer OUT : अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेता टायगर श्रॉफ स्टारर ॲक्शन ड्रामा चित्रपट 'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या ट्रेलरची प्रतीक्षा संपली आहे. 'बडे मियाँ छोटे मियाँ'चा ट्रेलर आज 26 मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. आज सकाळी 'बडे मियाँ छोटे मियाँ'चं नवीन पोस्टर शेअर करून निर्मात्यांनी ट्रेलर रिलीजच्याबाबतीत माहिती दिली होती, शेवटी ट्रेलर रिलीज झाला आहे. 'बडे मियाँ छोटे मियाँ'चा ट्रेलर पाहण्यासारखा आहे. यामध्ये अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ शानदार ॲक्शन करताना दिसत आहेत. अली अब्बास जफर या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटाची निर्मिती जॅकी भगनानी आणि रकुल प्रीत सिंग यांची प्रॉडक्शन कंपनी पूजा एंटरटेनमेंटची आहे.

'बडे मियाँ छोटे मियाँ'चं ट्रेलर रिलीज :'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर येत्या ईदला म्हणजेच 10 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, टायगर श्रॉफ व्यतिरिक्त सोनाक्षी सिन्हा आणि मानुषी छिल्लर मुख्य भूमिकेत आहेत. 'बडे मियाँ छोटे मियाँ'चं शूटिंग वेगवेगळ्या शहरांमध्ये झाले असून हा चित्रपट खूप मनोरंजक असणार आहे. या चित्रपटाच्या माध्यामातून पहिल्यांदाच अक्षय आणि टायगर एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. दरम्यान, हे दोन्ही स्टार्स गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. या जोडीनं त्याचे काही ॲक्शन करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते, जे अनेकांना खूप आवडले होते.

टायगर आणि अक्षचे आगामी चित्रपट : 'बडे मियाँ छोटे मियाँ'मधील ही जोडी आयपीएलच्या उद्घाटन समारंभात परफॉर्म करताना दिसली. याशिवाय त्यांनी एकत्र होळी देखील साजरी केली होती. या जोडीच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर अक्षय आगामी 'धुम 4', 'हाऊसफुल्ल ५',' राउडी राठोड २', 'वेलकम टू द जंगल', 'स्काय फोर्स', 'सराफिरा' आणि 'सिंघम अगेन' या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत. याशिवाय टायगर हा शेवटी 'गणपथ: ए हीरो इज़ बॉर्न' या चित्रपटामध्ये दिसला होता. त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. आता तो 'सिंघम अगेन' आणि 'रॅम्बो' या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत.

हेही वाचा :

  1. पाकिस्तानी तरुंगात अडकलेल्या मच्छीमारांची प्रेरणादायी गोष्ट 'थांडेल', नागा चैतन्यने सांगितला प्रेमकथेचा तपशील - Sai Pallavi in Thandel
  2. आरसीबीच्या विजयानंतर विराट कोहलीनं मैदानातून अनुष्का शर्मासह मुलांना केला व्हिडिओ कॉल - virat kohli video viral
  3. जान्हवी कपूरनं 'देवरा पार्ट 1'च्या गोव्यातील शुटिंग सेटवरून केला फोटो शेअर - Janhvi kapoor

ABOUT THE AUTHOR

...view details