महाराष्ट्र

maharashtra

का साजरा करण्यात येतो समता दिवस; जाणून घ्या कोण होते बाबू जगजीवन राम ? - Samata Diwas 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 5, 2024, 9:40 AM IST

Samata Diwas 2024 : बाबू जगजीवन राम यांची जयंती समता दिवस म्हणून साजरी करण्यात येते. बाबू जगजीवन राम यांनी आयुष्यभर मागासवर्गीय नागरिकांच्या हक्कासाठी प्रयत्न केले. बाबू जगजीवन राम यांनी केंद्र सरकारमध्ये अनेक पदं भूषवलं आहेत.

Samata Diwas 2024
बाबू जगजीवन राम

हैदराबाद Samata Diwas 2024 : देशात 5 एप्रिल रोजी समता दिवस साजरा करण्यात येतो. समता दिवस हा देशातील प्रमुख नेते बाबू जगजीवन राम यांच्या जयंती दिनी साजरा करण्यात येतो. बाबू जगजीवन राम हे देशातील प्रमुख नेत्यांमध्ये गणले जात होते. त्यांना बाबूजी म्हणूनही बोललं जातं होतं. बाबू जगजीवन राम यांचं जीवन आणि त्यांनी राजकारणात दिलेलं योगदान हे अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.

बाबू जगजीवन राम यांचं जीवन आणि शिक्षण :बाबू जगजीवन राम यांचा जन्म बिहारमधील चांदवा या गावात एका मागासवर्गीय कुटुंबात 5 एप्रिलला झाला होता. त्यांना आयुष्याच्या सुरुवातील भेदभावाचा सामना करावा लागला. पूर्वग्रहांना तोंड देऊनही त्यांनी मोठ्या धडाडीनं शिक्षण घेतलं. बाबू जगजीवन राम यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून आणि नंतर कोलकत्ता विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. महाविद्यालयीन जीवनापासूनचं बाबू जगजीवन राम यांनी सामाजिक अन्यायाविरुद्ध लढण्याचा निर्धार केला.

विद्यार्थी चळवळीतून घडलेला नेता : बाबू जगजीवन राम हे विद्यार्थी चळवळीतून घडलेले नेते होते. त्यासह त्यांनी लिबरेशन फायटर म्हणून जोरदार कार्य केलं. विद्यार्थी चळवळीत केलेल्या कार्यामुळे ते अल्पावधितच मोठे लोकप्रिय झाले. त्यामुळे त्यांना वयाच्या 28 व्या वर्षी बिहार विधानपरिषदेवर घेण्यात आलं. आमदारकीची सुरुवात झाल्यानंतर बाबू जगजीवन राम यांनी कधीच मागं वळून पाहिलं नाही.

ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस लीगची स्थापना :मागासवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या बाबू जगजीवन राम यांनी मागासवर्गीय नागरिकांच्या हक्कांचा पुरस्कार केला. मागासवर्गीय नागरिकांच्या हक्कांसाठी त्यांनी 1935 मध्ये ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस लीगची स्थापना करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. बाबू जगजीवन राम यांनी कामगार मंत्री, दळणवळण मंत्री आणि संरक्षण मंत्री अशा महत्त्वाच्या पदांवर काम केलं. भारताची धोरणं आणि प्रशासन घडवण्यात त्यांचं नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरलं. मात्र इंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणीला विरोध करत त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. समाजासाठी काम करत असताना 6 जुलै 1986 ला त्यांचं निधन झालं. त्यांची जयंती समता दिवस म्हणून साजरा करण्यात येते.

हेही वाचा :

  1. अमिताभ बच्चनची कारकीर्द उजवळणारे मनमोहन देसाई, 23 पैकी 15 चित्रपट ब्लॉकबस्टर बनवणार निर्माता
  2. काश्मीर खोऱ्यात हिमवर्षावात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती! सैन्याचा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा
  3. 'साहेबांमुळेच' कृषीसह औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र राज्य कायम आघाडीवर, अजित पवारांचे महाराष्ट्राच्या शिल्पकारांना वंदन

ABOUT THE AUTHOR

...view details