महाराष्ट्र

maharashtra

भारत जोडो न्याय यात्रेचा बिहारमधील शेवटचा दिवस, राहुल गांधींच्या चारचाकीचं तेजस्वी यादवांनी केलं सारथ्य

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 16, 2024, 10:56 PM IST

Updated : Mar 2, 2024, 5:14 PM IST

राहुल गांधी सध्या भारत जोडो न्याय यात्रा फेज-2 दरम्यान बिहारमध्ये आहेत. या यात्रेचा गुरुवारी औरंगाबादेत समारोप झाला. आरजेडीचे आमदार आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादवदेखील यात्रेत सहभागी झाले.

Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra
भारत जोडो यात्रेत राहुल गांधी तेजस्वी यादव

रोहतासःकाँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' सध्या बिहारच्या सासाराममध्ये आहे. सासाराममधील 'भारत जोडो न्याय यात्रे'दरम्यान बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव हे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासोबत यात्रेत सहभागी झाले होते. त्यांनी आज राहुल गांधींच्या गाडीचं 'सारथी' म्हणून काम केलं. तेजस्वी यादव गाडी चालवत होते. शेजारच्या सीटवर राहुल गांधी बसले होते. सासाराममध्ये भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधींनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांनी आज भारत बंदची हाक दिलेली आहे.

कैमूर जिल्ह्यातून उत्तर प्रदेशात दाखल : मणिपूर ते महाराष्ट्र या भारत जोडो न्याय यात्रेवर असलेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सध्या बिहारमध्ये आहेत. बिहारमधील भारत जोडो न्याय यात्रेचा आज शेवटचा दिवस आहे. ही यात्रा सध्या सासाराम जिल्ह्यात आहे जिथून ती कैमूर जिल्ह्यातून उत्तर प्रदेशात दाखल होणार आहे. बिहारमधून यूपीमध्ये येण्यापूर्वी सासाराम येथून यात्रेदरम्यान काढलेले छायाचित्र समोर आलं आहे. यामध्ये राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) तेजस्वी यादव हे खुल्या जीपच्या ड्रायव्हिंग सीटवर दिसत होते.

आरजेडीच्या आघाडीची ताकद सांगण्याचा प्रयत्न : भारत जोडो न्याय यात्रेच्या या छायाचित्रात तेजस्वी यादव ड्रायव्हिंग सीटवर दिसत होते. तर, राहुल गांधी ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर होते. राहुल गांधींच्या न्याय यात्रेत सारथीच्या भूमिकेत दिसणाऱ्या तेजस्वी यादवने स्वतः ही छायाचित्रे एक्स मीडियावर पोस्ट केली आहेत. बिहारमध्ये काँग्रेस आणि आरजेडीच्या आघाडीची ताकद सांगण्याचा प्रयत्न आणि लालू यादव यांचा पक्ष राज्यात भारत आघाडीचे नेतृत्व करेल, असे हे चित्र मानले जात आहे.

तब्येत ठीक नसल्याने शक्यता कमी : राहुल गांधींची यात्रा दुसऱ्यांदा बिहारमध्ये आली होती. राज्यातील सत्तेचे चित्र बदलले, आघाड्यांचे गणित बदलले, हे विशेष. विरोधकांची एकजूट करणारे नितीश कुमार हे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सामील झाले. सध्या काँग्रेस, आरजेडी आणि डावे पक्ष एकत्र आहेत. आता राहुल गांधींच्या न्याय यात्रेत सहभागी होऊन विरोधकांची एकजूट धाखली आहे. आज ही यात्रा चंदौलीहून कैमूरमार्गे यूपीमध्ये दाखल होणार आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी याही यूपी प्रवेशावेळी उपस्थित राहणार आहेत. मात्र, त्यांची तब्येत ठीक नसल्याने त्या सहभागी होतील की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

Last Updated :Mar 2, 2024, 5:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details