महाराष्ट्र

maharashtra

मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या घरी आली 'लक्ष्मी'; कोठडीतून केजरीवालांनी दिल्या शुभेच्छा - CM Bhagwant Mann Becomes Father

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 28, 2024, 10:08 PM IST

CM Bhagwant Mann : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या घरी आनंदाचं वातावरण आहे. त्यांची पत्नी डॉ. गुरप्रीत कौर यांनी गुरुवारी एका मुलीला जन्म दिलाय. खुद्द मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' च्या माध्यमातून ही माहिती दिली.

CM Bhagwant Mann
CM Bhagwant Mann

चंदीगड CM Bhagwant Mann:पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या पत्नी डॉ. गुरप्रीत कौर यांनी मुलीला जन्म दिला आहे. काल रात्रीच सीएम मान यांच्या पत्नी डॉ. गुरप्रीत कौर यांना मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. खुद्द मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली. त्यांनी लिहिलं, "देवानं मुलीची देणगी दिली आहे. आई-मूल निरोगी आहे." मुख्यमंत्री भगवंत मान वयाच्या 50 व्या वर्षी तिसऱ्यांदा वडील झाले आहेत. त्यांना पहिल्या पत्नीपासून २ मुले आहेत.

16 वर्षांनी लहान डॉ. गुरप्रीत कौरशी विवाह :7 जुलै 2022 रोजी, मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांच्यापेक्षा 16 वर्षांनी लहान असलेल्या 32 वर्षीय डॉ. गुरप्रीत कौर यांच्याशी लग्नगाठ बांधली होती. सीएम मान यांचं हे दुसरं लग्न आहे. डॉ. गुरप्रीत कौर या हरियाणाच्या पेहोवा येथील रहिवासी असून त्या एमबीबीएस डॉक्टर आहेत. सीएम भगवंत यांचं पहिलं लग्न इंद्रप्रीत कौरशी झालं होतं. पण 2015 मध्ये दोघांनी परस्पर संमतीनं घटस्फोट घेऊन वेगळं होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर इंद्रप्रीत दोन्ही मुलांसह अमेरिकेला गेल्या.

26 जानेवारीला दिली होती माहिती : 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री भगवंत मान यांनी माझी पत्नी डॉ. गुरप्रीत कौर 6 महिन्यांची गरोदर असल्याची माहिती दिली होती. मार्चमध्ये आमच्या घरी आनंदाच वातावरण असेल असं देखील त्यांनी म्हटलं होतं.

2019 मध्ये झाली भेट : मुख्यमंत्री भगवंत मान यांची दुसरी पत्नी डॉ. गुरप्रीत कौर या मूळच्या हरियाणातील पेहोवा येथील आहेत. त्यांना एकून 3 बहिणी आहेत. 2013 मध्ये गुरप्रीत कौर यांनी अंबाला येथील मुलाना मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. 2017 मध्ये त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. 2019 मध्ये त्यांनी पंजाबचे विद्यमान मुख्यमंत्री भगवंत मान यांची भेट घेतली होती. भगवंत मान त्यावेळी संगरूरमधून लोकसभेचे खासदार होते.

हे वाचलंत का :

  1. अभिनेता गोविंदा पुन्हा राजकारणात; शिंदेंच्या शिवसेनेत केला प्रवेश, उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून लढणार निवडणूक? - Actor Govinda joins Shiv Sena
  2. काँग्रेसच्या रश्मी बर्वेंचा उमेदवारी अर्ज ठरला अवैध, महाविकास आघाडी निकालापूर्वीच बॅकफूटवर - rashmi barve caste verification
  3. 'हट्ट कुणाचाही असो, हक्क तुमचाच'; साताऱ्याच्या उमेदवारीसाठी अजित पवार यांना कार्यकर्त्यांचा आग्रह - Ajit Pawar Group

ABOUT THE AUTHOR

...view details